पुणे:नवरात्र उत्सव सुरू आहेत. या काळात अनेक जण उपवास करतात, या उपवासादरम्यान फलाहार करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी, फळांच्या दरांत वाढ होते.या काळात फळांची उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. सध्याचे बाजार भाव काय आहेत याबद्दल फळ विक्रेते नवीन शेख यांनी माहिती दिली आहे.