Dattu More : बायको डॉक्टर, मुलाच्या जन्मानंतर दत्तू मोरेची नवी इनिंग; ठाण्यात सुरू केला व्यवसाय
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dattu More New Business : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरेनं नवी इनिंग केली आहे. दत्तूने ठाण्यात त्याचा नवा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
1/8

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता दत्तू मोरे. आपल्या विनोदी शैलीने दत्तू मोरेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. दत्तू मोरे काही महिन्यांआधीच बाबा झाला.
advertisement
2/8
एकीकडे अभिनेता, नवरा, वडिल अशा जबाबदाऱ्या सांभाळत असताना दत्तू मोरेनं त्याच्या आयुष्याची एक नवी इनिंग सुरू केली आहे. दत्तू मोरे आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
3/8
अभिनयासोबतच दत्तूने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. दत्तू मोरेनं ठाण्यात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. Daily Bowl या नावाने त्याने क्लाऊड किचन सुरू केलं आहे. यामार्फत लोकांना हेल्दी फूड देण्याचा दत्तूचा प्रयत्न आहे.
advertisement
4/8
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण फास्ट फूडवर अवलंबून असतात. तेलकट, तुपकट आणि चमचमीत पदार्थांची सवय वाढत चालली आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. विशेषतः ऑफिसला जाणाऱ्या लोकांकडे वेळेची कमतरता असते. सकस आहार बनवणे किंवा योग्य वेळी खाणे त्यांना जमत नाही. हीच गरज ओळखून दत्तू मोरेने Daily Bowl ही संकल्पना आणली आहे.
advertisement
5/8
या क्लाऊड किचनमधून पौष्टिक, संतुलित आणि घरगुती चवीचे जेवण देण्यावर भर असणार आहे. दत्तू आणि त्याच्या वडिलांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे. 7-8 फेब्रुवारी रोजी ठाण्यात होणाऱ्या 'उपवन फेस्टिव्हल'मध्ये Daily Bowl ऑफिशिअल लॉन्च होणार आहे. त्यानंतर हे क्लाऊड किचन झोमॅटो आणि स्विगीसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. ठाणेकरांना घरबसल्या हेल्दी फूडचा पर्याय मिळणार आहे.
advertisement
6/8
दत्तूच्या या नव्या उपक्रमाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेक चाहत्यांनी त्याच्या मेहनतीला सलाम करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
advertisement
7/8
दत्तू मोरे मे 2025 मध्ये बाबा झाला. त्याला मुलगा झाला असून 'Welcome छोटा दत्तू मोरे' असं म्हणत त्याने ही गुड न्यूज शेअर केली होती.
advertisement
8/8
दत्तू मोरेने 2023 मध्ये स्वाती घुनागे हिच्याशी लग्न केलं. स्वाती व्यवसायाने डॉक्टर असून ती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने ठाण्यात स्वतःचे नवीन क्लिनिक सुरू केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dattu More : बायको डॉक्टर, मुलाच्या जन्मानंतर दत्तू मोरेची नवी इनिंग; ठाण्यात सुरू केला व्यवसाय