TRENDING:

Guess Who : मिथुन चक्रवर्तीची हीरोइन, त्या भयंकर सीनने बदललं आयुष्य; रात्रीची झोपही उडाली

Last Updated:
Mithun Chakraborty Heroine : मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्रीला एका बलात्काराच्या दृश्याने अशी प्रसिद्धी मिळाली की सर्वत्र तिची चर्चा सुरू झाली. पण हाच एक सीन तिच्या आयुष्याचा शाप ठरला. या सीनचा तिच्या मनावर परिणाम झाला आणि तिची रात्रीची झोपदेखील उडाली.
advertisement
1/7
Guess Who : मिथुन चक्रवर्तीची हीरोइन, त्या भयंकर सीनने रात्रीची झोपच उडाली
रणवीर सिंहने ‘पद्मावत’ या चित्रपटात अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर रणवीरने सांगितले होते की त्या पात्राचा इतका परिणाम त्याच्या मनावर झाला होता की त्याला स्वतःला वेड लागल्यासारखे वाटू लागले होते. मात्र, हा अनुभव फक्त रणवीरलाच नाही, तर त्याच्याआधीही अनेक कलाकार अशा अवस्थेतून गेले आहेत.
advertisement
2/7
काहीवेळा कलाकार आपल्या भूमिकेत इतके बुडून जातात की त्यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी कठीण होते. कधी एखाद्या दृश्याचा इतका परिणाम होतो की त्यांना झोपसुद्धा लागत नाही. बंगाली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले.
advertisement
3/7
रितुपर्णा सेनगुप्ता हे बंगाली आणि हिंदी सिनेमातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांचा बंगाली सिनेमातील प्रवास अत्यंत दमदार राहिला असून त्यांनी अनेक मोठे पुरस्कार आपल्या नावे कोरले आहेत. त्यांनी 1992 मध्ये ‘श्वेत पाथरेर थाला’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी एका विधवेची नकारात्मक भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झाले आणि हा चित्रपट हिट ठरला. यानंतर हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी एक माइलस्टोन ठरला.
advertisement
4/7
बंगाली सिनेमात यशस्वी ठरल्यावर रितुपर्णाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत ‘तीसरा कौन’ (1994) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि रितुपर्णाच्या करिअरला नवे वळण मिळाले.
advertisement
5/7
रितुपर्णाने यानंतर 1997 मध्ये 'दहन' हा एक बंगाली चित्रपट केला. या चित्रपटात रितुपर्णा सेनगुप्ता यांच्यावर एक बलात्काराचे दृश्य चित्रित करण्यात आले होते. हा सीन खूप चर्चेत आला, पण हाच सीन त्यांच्या आयुष्यात भयानक ठरला. या दृश्याचा त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्या अनेकदा रात्री घाबरून झोपेतून जाग्या व्हायच्या.
advertisement
6/7
रितुपर्णा यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की या सीनमुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला होता. त्या वारंवार त्या दृश्याचे स्वप्नात दर्शन घ्यायच्या आणि घाबरून उठायच्या. मात्र, हळूहळू त्यांनी स्वतःला सावरले आणि या मानसिक तणावातून बाहेर पडल्या.
advertisement
7/7
रितुपर्णा यांनी केवळ हिंदी आणि बंगालीच नव्हे तर मल्याळम आणि कन्नड चित्रपटांतही काम केले आहे. त्या 1996 च्या कन्नड चित्रपट ‘पुत्र’ मध्ये आणि 2013 च्या मल्याळम चित्रपट ‘काधवीदू’ मध्येही झळकल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : मिथुन चक्रवर्तीची हीरोइन, त्या भयंकर सीनने बदललं आयुष्य; रात्रीची झोपही उडाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल