TRENDING:

माझ्या मांडीचा चावा घेतला! पुण्यातील टेकडीवर 'पिट्या भाई'सोबत घडला भयंकर प्रकार

Last Updated:
Pitya Bhai Ramesh Pardeshi : पिट्या भाई म्हणजे अभिनेते रमेश परदेशी यांनी पुण्यातील टेकडीवर त्यांच्यासोबत घडलेल्या एका भयंकर प्रकाराबाबत सोशल मीडियावर सांगितलं आहे.
advertisement
1/7
माझ्या मांडीचा चावा घेतला! पुण्यातील टेकडीवर 'पिट्या भाई'सोबत घडला भयंकर प्रकार
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेता पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी पुण्यातील टेकडीवर त्यांच्यासोबत घडलेल्या भयंकर प्रकाराबाबत सांगितलं आहे. टेकडीवर ते पळायला गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत भयंकर घडलं. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत सविस्तर सांगितलं आहे.
advertisement
2/7
रमेश परदेशी म्हणाले, नेहमीप्रमाणे ARAI टेकडीवर पळायला गेलो होतो. घरी आल्यावर आंघोळ करताना लक्षात आलं आपल्याला मघाशी किरकोळ चावलंय अस वाटलेलं ते जास्त दुखतंय. म्हणून सरकारी दवाखान्यात गेलो तर त्यांनी सांगितलं टोटल 5 इंजेक्शन घ्यावी लागतील काही तरी टाइप 3 आहे म्हणून. आता 2 घेतली अजून 7 दिवसाच्या अंतराने बाकी घ्यायची आहेत. हेच एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध माणसाला चावलं असतं तर केवढ्याला पडले असतं?
advertisement
3/7
रमेश परदेशी यांना टेकडीवर कुत्रा चावला. मांडीला एका कुत्र्याने चावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, टेकडीवर  पळत असताना एका ठिकाणी 4 ते 5 कुत्री खात होती. तिथून जाताना त्यातल्या एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला. मी तसंच पुढे गेलो तर माझ्यासारखाच एक प्राणी प्रेमी मित्र 10 ते 12 कुत्र्यांना खायला देत होता. मी पण कधी कधी सीटीमध्ये उपाशी कुत्र्यांना पाव, बिस्किट देत असतो.
advertisement
4/7
'पण मी त्याला बोललो, अरे इथं नको देऊ खायला मला आताच एक कुत्रे मागे चावलंय. मेन रोड वर दे. नाहीतर हे लहान मुलं, वृद्धांच्या अंगावर येतात"
advertisement
5/7
रमेश परदेशी पुढे म्हणाले,  मी पण प्राणी प्रेमी आहे. पण मला वाटतं या भटक्या कुत्र्यांची राहणं, खाण्याची  काहीतरी बरी सोय केली पाहिजे. आज एक अंगावर आला, चावला, मी प्रतिकार करू शकलो. पण 10-12 एकदम अंगावर आले तर बरं-वाईट काही झालं तर जबाबदार कोण? अजून खूप जबाबदाऱ्या अंगावर आहेत.
advertisement
6/7
माणसाचा आणि कुत्र्याचा दोघांचा जीव अतिशय महत्वाचा आहे. नगरसेवक, आमदार, महापौर सर्वांना विनंती आहे की भटक्या कुत्र्यांची काही तरी चांगली सोय करावी. या मुक्या प्राण्यांवर पण अन्याय होणार नाही आणि ते पण छान जगतील आणि बाकी नागरिक पण. दोन्ही जीव सुरक्षित राहतील.
advertisement
7/7
सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्याची दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. परमेश्वर करो आता रेबीज वैगरे नको व्हायला, अशी स्वत:बाबत चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माझ्या मांडीचा चावा घेतला! पुण्यातील टेकडीवर 'पिट्या भाई'सोबत घडला भयंकर प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल