थिएटरमध्ये घातला धुमाकूळ; आता घरबसल्या पाहा MUNJYA; या OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'मुंज्या' या हॉरर-कॉमेडी चित्रपटानं रिलीज होताच थिएटरमध्ये धुमाकूळ घातलाय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. जेव्हाही चित्रपटगृहांमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा प्रेक्षक त्याच्या ओटीटी रिलीजची वाट पाहू लागतात. हॉरर-कॉमेडी चित्रपट असलेल्या 'मुंज्या'च्या बाबतीतही तेच घडतंय. लोक आता या चित्रपटाची OTT वर येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर काही कारणास्तव तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नसेल, तर आज आम्ही तुम्हाला हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत याची माहिती देणार आहोत.
advertisement
1/7

'स्त्री', 'रुही' आणि 'भेडिया' या चित्रपटांनंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्समधील 'मुंज्या' हा चौथा चित्रपट आहे. 'मुंज्या' हा चित्रपट तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह पाहू शकता.
advertisement
2/7
चित्रपटात 'मुंज्या' हे पात्र भारतीय भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजेच Computer Generated Imaginary पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आला आहे.
advertisement
3/7
मुंज्या हा महाराष्ट्रीय संस्कृतीतील एक प्रकारचं भूत आहे. कोकण आणि पुणे भागात या सिनेमाचं कथानक फिरतं. यात हॉरर कथानकासोबतच रोमान्सचा तडकाही पाहायला मिळाला.
advertisement
4/7
चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुन्नीशी लग्न करायचं असतं पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंज्या बनतो आणि चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते.
advertisement
5/7
चित्रपटाची कथा एकदम फ्रेश आहे आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय तुमचं मनं जिंकेल यात शंका नाही. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात शर्वरी, अभय वर्मा, मोना सिंग, सत्यराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
6/7
मुंज्याने अवघ्या १० दिवसात ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
advertisement
7/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ अभिनीत या चित्रपटाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ने विकत घेतले आहेत आणि आजपासून 2 महिन्यांनंतर हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थिएटरमध्ये घातला धुमाकूळ; आता घरबसल्या पाहा MUNJYA; या OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज