TRENDING:

Nitish Chauhan Death Reason : अभिनेता नितीन चौहानने का संपवलं आयुष्य? मृत्यूच्या 2 दिवसांनी पत्नीने केला मोठा खुलासा

Last Updated:
Nitish Chauhan Death Reason : अभिनेता नितीन चौहानच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.अभिनेत्याच्या आत्महत्येवर त्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/7
नितीन चौहानने का संपवलं आयुष्य? मृत्यूच्या 2 दिवसांनी पत्नीने केला मोठा खुलासा
अभिनेता नितिन चौहान याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्री पुन्हा हादरून गेली. 7 नोव्हेंबरला नितीनने घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं.
advertisement
2/7
अभिनेता नितीनने आत्महत्या केली तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगी बागेत बसले होते. त्या घरी परतल्या तेव्हा घरातून कोणी आवाज देत नव्हता. त्यांनी अनेकदा डोअर बेल वाजवली पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
advertisement
3/7
नितीनच्या पत्नीला संशय आल्याने तिने दरवाजा तोडला. ती आत जाताच नितीन पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. नितीनला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
advertisement
4/7
अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याने असं का केलं याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, नितीनच्या पत्नीने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
advertisement
5/7
इंडियन एक्‍ट्रेसच्या रिपोर्टनुसार, दिंडोशी पोलिसांनी सांगितलं की, नितीन डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये त्याच्या पत्नीने सांगितलं की, "नितीनला मागील 3-4 वर्षांपासून काम मिळत नव्हतं. ज्यामुळे त्याची मानसिक परिस्थिती बिघडली होती."
advertisement
6/7
"काम मिळत नसल्याने त्याने आइस्क्रीमचा बिझनेस सुरू केला. पण या बिझनेसने देखील त्याचं काही झालं नाही."
advertisement
7/7
नितीन 'स्प्लिट्सविला 5' या शोमधून प्रसिद्धीझोतात आला होता. 'दादागिरी 2'मुळे त्याला फेम मिळाली. त्याचबरोबर तो 'क्राइम पेट्रोल', 'जिंदगी डॉट कॉम', 'फ्रेंड्स' सारख्या शोमध्ये दिसला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nitish Chauhan Death Reason : अभिनेता नितीन चौहानने का संपवलं आयुष्य? मृत्यूच्या 2 दिवसांनी पत्नीने केला मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल