TRENDING:

कॅनडाहून 5000 रुपये घेऊन भारतात आली, धक्कादायक अनुभवांचा केला सामना, आज टॉपची अभिनेत्री

Last Updated:
Nora Fatehi birthday: नोरा फतेहीने आज केवळ भारतातच नाही तर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा तिच्यासाठी काळ खूप कठीण होता.
advertisement
1/7
5000 रुपये घेऊन भारतात आली, धक्कादायक अनुभवांचा केला सामना, आज टॉपची अभिनेत्री
नोरा फतेहीने आज केवळ भारतातच नाही तर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा तिच्यासाठी काळ खूप कठीण होता. नोरा फतेहीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लाइफ स्ट्र्गलविषयी जाणून घेऊया. 6 फेब्रुवारीला नोराचा वाढदिवस असतो. यंदा ती 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
advertisement
2/7
बिग बॉस सीझन 9 नंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली कॅनेडियन वंशाची अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे नोरा फतेही. नोरा फतेहीचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 रोजी कॅनडामध्ये झाला. बराच काळ संघर्ष केल्यानंतर, नोराने 2014 मध्ये 'रोअर' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.
advertisement
3/7
पण, बिग बॉसने नोराला सर्वात जास्त ओळख दिली. नोराने बिग बॉस 9 मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता.यानंतर, 2016 मध्ये, नोराने 'झलक दिखला जा' या दुसऱ्या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या नृत्याची जादू दाखवली.
advertisement
4/7
जेव्हा नोरा फतेही कॅनडाहून भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त 5000 रुपये होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नोराने खूप संघर्ष केला आहे. नोरा आज तिच्या कारकिर्दीत खूप यशस्वी आहे आणि तिच्याकडे कामाची कमतरता नाही.
advertisement
5/7
एका मुलाखतीत नोराने सांगितले होते की तिने आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एका कॉफी शॉपमध्ये कामही केले होते. एवढेच नाही तर तिच्या संघर्षाच्या काळात ती अनेक वेळा रडत घरी परतायची.
advertisement
6/7
नोराने खुलासा केला होता की तिच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये तिला एका कास्टिंग एजंटचा सामना करावा लागला ज्याने तिला केवळ अपमानित केले नाही तर तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अश्लील टिप्पण्या केल्या आणि तिची चेष्टा केली.
advertisement
7/7
नोराने आतापर्यंत मकरिया, ओ साकी-साकी, दिलबर, छोड देंगे, एक तो काम जिंदगी, हाय गर्मी अशी अनेक ब्लॉकबस्टर गाणी दिली आहेत. याशिवाय ती भारत, स्ट्रीट डान्सर 3D, भुज सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कॅनडाहून 5000 रुपये घेऊन भारतात आली, धक्कादायक अनुभवांचा केला सामना, आज टॉपची अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल