TRENDING:

सिनेमा-वेबसिरीजला रामराम, आदिनाथ कोठारेची छोट्या पडद्यावर धमाकेदार एंट्री! 'या' मालिकेत दिसणार

Last Updated:
लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता छोट्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
1/9
सिनेमा-वेबसिरीजला रामराम, आदिनाथ कोठारेची छोट्या पडद्यावर धमाकेदार एंट्री!
मुंबई: लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता छोट्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
2/9
आदिनाथ तब्बल अनेक वर्षांनी मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील 'नशिबवान' या मालिकेत तो 'रुद्रप्रताप घोरपडे' ही दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे.
advertisement
3/9
'नशिबवान' या मालिकेतील रुद्रप्रताप घोरपडेची भूमिका आदिनाथसाठी एका ड्रीमरोलसारखी आहे. रुद्रप्रताप हा नागेश्वर घोरपडे यांचा एकुलता एक मुलगा.
advertisement
4/9
तो दिसायला एखाद्या राजकुमारासारखा आहे, पण त्याचा स्वभाव त्याच्या वडिलांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. नागेश्वर घोरपडे यांना त्यांचा मोठा व्यवसाय पुढे नेण्यासाठी रुद्रला परदेशात पाठवायचं होतं, पण रुद्रने मात्र गावात राहून, गावकऱ्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/9
या भूमिकेबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला, “माझी ही पहिली मालिका आहे. गेली अनेक वर्षं मालिका करण्याचा विचार सुरू होता. नशिबाने 'नशिबवान' मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला.”
advertisement
6/9
आदिनाथने टीव्ही माध्यमाबद्दलही आपले प्रेम व्यक्त केले. तो म्हणाला, “टीव्ही हे फक्त माझंच नाही, तर प्रत्येकाचं आवडतं माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनता.”
advertisement
7/9
त्याने 'स्टार प्रवाह'सोबतच्या जुन्या नात्याबद्दलही सांगितलं. आदिनाथ म्हणाला, “निर्माता म्हणून ‘कोठारे व्हिजन’ची पहिली मालिका स्टार प्रवाहसोबतच केली होती.
advertisement
8/9
त्यानंतर अनेक सुपरहिट मालिका केल्या. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत नवीन प्रोजेक्टची सुरुवात होतेय, याचा खूप आनंद आहे.”
advertisement
9/9
'नशिबवान' मालिकेत अनेक दिग्गज कलाकार आहेत आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही छान कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सिनेमा-वेबसिरीजला रामराम, आदिनाथ कोठारेची छोट्या पडद्यावर धमाकेदार एंट्री! 'या' मालिकेत दिसणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल