TRENDING:

गँगस्टरच्या एन्ट्रीने मुंबईत वादळ, 2 तास 34 मिनिटांचा सुपरहिट क्राईम ड्रामा, या OTT वर येतोय

Last Updated:
Netflix Movie : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यासाठी एक बहुप्रतीक्षित चित्रपट सज्ज आहे.
advertisement
1/7
2 तास 34 मिनिटांचा सुपरहिट क्राईम ड्रामा, या OTT वर येतोय
लोकप्रिय अभिनेता पवन कल्याणचा 'दे कॉल हिम ओजी' हा तेलुगु चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने रिलीज होताच इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवली. 25 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 300 कोटी रुपयांची कमाई करत 2025 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळख मिळवली आहे.
advertisement
2/7
अ‍ॅक्शन आणि जबरदस्त कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. पवन कल्याणच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. तर सहाय्यक कलाकारांनी सुद्धा आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
advertisement
3/7
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत पवन कल्याणचा 'दे कॉल हिम ओजी' हा ब्लॉकबस्टर चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार 23 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.
advertisement
4/7
चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यासह कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय,"एक काळ होता जेव्हा मुंबईत एक वादळ यायचं… आणि आता, तो परत आलाय. 23 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये ‘दे कॉल हिम ओजी’ पाहा. #TheyCallHimOGOnNetflix"
advertisement
5/7
पवन कल्याण आणि इमरान हाश्मीच्या ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटाने 19 दिवसांत 293.65 कोटींचा गल्ला जमवला. भारतात 228.4 कोटी तर परदेशात 65.25 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 169.3 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 18.5 कोटी, तर तिसऱ्या आठवड्यात 191.5 कोटींची कमाई करत सर्वांचे लक्ष वेधले. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे जर कोणी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकलं नसेल, तर त्यांना दिवाळीच्या तिसऱ्या दिवसापासून घरबसल्या पाहता येईल.
advertisement
6/7
सुजीतने लिहिलेल्या या क्राईम ड्रामा चित्रपटात पवन कल्याण आणि इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत आहेत. इमरान हाश्मी यात मुख्य खलनायकाची भूमिका साकारत आहेत. अर्जुन दास आणि प्रियांका मोहन सुद्धा या चित्रपटात आहेत. हा चित्रपट 25 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.
advertisement
7/7
‘ओजी’ ही कथा आहे ओजस गंभीरा (पवन कल्याण) या गँगस्टरची. पवन कल्याणने स्वतः या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे आणि सांगितले की ‘दे कॉल हिम ओजी 2’ वर सध्या काम सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गँगस्टरच्या एन्ट्रीने मुंबईत वादळ, 2 तास 34 मिनिटांचा सुपरहिट क्राईम ड्रामा, या OTT वर येतोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल