OTT वरील सर्वात TOP सीरिज, भरभरून भरलाय क्राइम-थ्रिलर, ड्रामा; 62 एपिसोड नेहमीच असतात ट्रेडिंगमध्ये
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Most Trending OTT Series: OTT वर प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला अनेक नवीन चित्रपट आणि सीरीज रिलीज होतात. ओटीटीप्रेमी या सर्व कलाकृती डोक्यावर घेतात आणि हळूहळू या सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करू लागतात. जर तुम्ही OTT लव्हर असाल आणि काही नवीन पाहायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला OTT वरील एक उत्कृष्ट सीरीज सांगणार आहोत, जी नेहमी OTT वर ट्रेंड करत राहते. म्हणून एकदा तरी ही सीरिज बघणं नक्कीच गरजेचं आहे.
advertisement
1/7

नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, Zee5, सोनी लिव्ह अशा विविध OTT प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि सीरिज ओटीटीप्रेमी डोक्यावर घेतात. सध्या ओटीटीवर एक उत्कृष्ट सीरिज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या सीरिजचे 62 एपिसोड नेहमीच टॉप 10 मध्ये ट्रेंड करत असतात. आतापर्यंत या जबरदस्त सीरिजचे 5 सीझन आले असून त्यांना 10 पैकी 9.5 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
2/7
ओटीटीवर उपलब्ध असणारी एक सीरिज तुमचं मन हलवणारी आहे. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेली गोष्ट एका साध्या शिक्षकाच्या आयुष्याबद्दल आहे. या शिक्षकाचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं आहे. रोजच्या समस्यांमध्ये लढताना अचानक त्याला एका गंभीर आजाराचा धक्का बसतो, ज्यामुळे त्याचं संपूर्ण जग बदलून जातं.
advertisement
3/7
मृत्यूचा भीती आणि कुटुंबाची जबाबदारी शिक्षकाला आतून हलवून टाकते. तो विचार करतो की आपल्या कुटुंबाचं भविष्य कसं सुरक्षित करावं. या विचारात तो असा मार्ग निवडतो, ज्याची कोणीही अपेक्षा करत नाही. या सीरीजचे आतापर्यंत 5 सिझन्स आले आहेत.
advertisement
4/7
ही सीरीज फक्त त्या शिक्षकाच्या संघर्षाची गोष्ट नाही, तर त्याच्यासोबत त्याचा एक जुना विद्यार्थीही आहे, जो आधीच चुकीच्या मार्गावर चाललेला असतो. दोघे मिळून एक धोकादायक उद्योगात उतरतात, जो त्यांना गुन्हेगारीच्या जगात घेऊन जातो. पण ही गोष्ट फक्त गुन्हेगारीची नाही, तर माणसाच्या आतल्या संघर्षाची, नैतिकतेची आणि कुटुंबासाठी केलेल्या बलिदानाचीही आहे. माणसाजवळ काहीही गमावण्यासाठी राहत नाही, तेव्हा तो काय करू शकतो हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. पुढे त्या शिक्षकाचा एक निर्णय त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरतो.
advertisement
5/7
‘ब्रेकिंग बॅड’ असं या सीरिजचं नाव आहे. ही एक अमेरिकन क्राइम-थ्रिलर ड्रामा सीरीज आहे. जी विंस गिलिगनने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या सीरीजचा पहिला एपिसोड 20 जानेवारी 2008 रोजी आला, तर शेवटचा एपिसोड 29 सप्टेंबर 2013 रोजी रिलीज झाला. ही सीरीज इतकी दमदार आणि रोमांचक आहे की तुम्ही शेवट पर्यंत बघायला थांबतच नाही.
advertisement
6/7
'ब्रेकिंग बॅड' या सीरीजमध्ये एकूण 5 सीझन्स आणि 62 एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड साधारणपणे 43 ते 58 मिनिटांचा आहे. अमेरिका, न्यू मेक्सिको शहरातील अल्बुकर्कमध्ये ही सीरिज चित्रित करण्यात आली आहे. ‘ब्रेकिंग बॅड’ मध्ये ब्रायन क्रॅन्स्टनने वाल्टर व्हाईट मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय अ‍ॅना गन, डीन नॉरिस, बेट्सी ब्रँट, आरजे मिटी, बॉब ओडेनकिर्क, जॉनथन बँक्स आणि जियानकार्लो एस्पोसिटो यांसारख्या कलाकारांनी या सीरिजमध्ये दमदार अभिनय केला आहे. प्रत्येक पात्राची खोली या सीरीजला खास बनवतो. विशेषतः वाल्टर आणि जेसीची जोडी प्रेक्षकांच्या हृदयात घर करते.
advertisement
7/7
‘ब्रेकिंग बॅड’चं प्रेक्षक आणि क्रिटिक्सकडून जबरदस्त कौतुक होत आहे. IMDb रेटिंग 9.5/10 आहे. त्यामुळेच ही सीरिज आतापर्यंतची सर्वोत्तम सीरीज आहे. या सीरीजला 16 प्राइमटाइम एमी अवॉर्ड्स आणि 2 गोल्डन ग्लोब्स मिळाले आहेत. ‘Ozymandias’ या एपिसोडला IMDb वर 10/10 रेटिंग मिळाली आहे. ही सीरीज आता हिंदी डबिंगमध्ये Zee Café वर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता पाहता येते. तसेच Zee5 आणि Netflix वर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत पाहता येऊ शकते, आणि ही नेहमीच टॉप 10 मध्ये ट्रेंड करत राहते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT वरील सर्वात TOP सीरिज, भरभरून भरलाय क्राइम-थ्रिलर, ड्रामा; 62 एपिसोड नेहमीच असतात ट्रेडिंगमध्ये