फुलवा खामकरचा लग्नाच्याच दिवशी सासरी फुटला हिरवा चुडा, 4 दिवसांनी हनिमूनला गेल्यावर केलेला हा पराक्रम
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Phulwa Khamkar : प्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकरचा लग्नाच्याच दिवशी सासरी गेल्यावर चुडा फुटला होता.
advertisement
1/7

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यांगना म्हणजे फुलवा खामकर होय. मराठी मालिका, चित्रपटांत आपल्या नृत्याच्या कलेने तिने स्वत:चा ठसा उमटवला आहे. फुलवा खामकर लालबागचे प्रसिद्ध मसालेविक्रेते अमर खामकर यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाला 25 वर्षे होऊन गेली असतील.
advertisement
2/7
प्रसिद्ध कोरिओग्राफर, अनेकांना नृत्याचे धडे देणारी फुलवा खामकर वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच वेंधळी आहे. फुलवा आणि अमर खामकर यांचं लव्हमॅरेज आहे.
advertisement
3/7
अमर खामकरसोबत लग्न केल्यानंतर सासरी पोहोचताच फुलवाने सर्वकाही आवरलं. दरम्यान सोफ्यावर बसलेली असताना तिने सर्वकाही आवरलं आणि चुड्याच्या हिरव्या बांगड्या मांडीवर काढून ठेवल्या.
advertisement
4/7
दरम्यान काहीतरी झालं म्हणून सोफ्यावर बसलेली फुलवा ताडकन उठली आणि सगळ्या बांगड्या खाली पडून फुटल्या. लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासरी चुडा फुटला म्हणून फुलवाला त्यावेळी रडू कोसळलं होतं.
advertisement
5/7
फुलवाच्या सासुबाई समंजस असल्याने त्यावेळी त्यांनी तिला सावरलं. पुढे लग्नानंतर चार दिवसांनी ते दोघे हनिमूनसाठी पाचगणीला गेले. सोबत आणखी एक जोडपं होतं. अतिशय थंडीच्या वातावरणात ते बोटीत बसले होते.
advertisement
6/7
फुलवाने त्याच उत्साहात पाण्यात हात घातला आणि त्याच क्षणाला बोटातली इंगेजमेंट रिंग पाण्यात पडली. अर्थात तिचा हा वेंधळेपणा अमरने सांभाळून घेतला म्हणूनच त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास सुखकर झाला.
advertisement
7/7
फुलवा आणि अमर यांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. कॉलेजच्या हायकर क्लबचे सदस्य असताना त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव आस्मा असं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फुलवा खामकरचा लग्नाच्याच दिवशी सासरी फुटला हिरवा चुडा, 4 दिवसांनी हनिमूनला गेल्यावर केलेला हा पराक्रम