प्राजक्ता गायकवाडच्या संसाराला सुरुवात, सासरी बनवला हा पहिला गोड पदार्थ
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Prajakta Gaikwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नुकतीच विवाहबंधनात अडकली असून आता तिच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे.
advertisement
1/7

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 2 डिसेंबर 2025 रोजी शंभुराज खुटवड यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
2/7
प्राजक्ताने आता आपल्या नव्या संसाराची सुरुवात केली आहे. सासरी तिने पहिला गोड पदार्थ बनवला आहे.
advertisement
3/7
प्राजक्ता गायकवाडने सासरच्या किचनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सासरच्या मंडळींसोबत पहिला गोड पदार्थ बनवताना दिसत आहे.
advertisement
4/7
प्राजक्ताने सासरी पहिला गोड पदार्थ 'गुलाबजाम' बनवला आहे. प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांनी गुलाबजाम बनवून सर्व कुटुंबियांना खाऊ घातले आहेत.
advertisement
5/7
प्राजक्ता गायकवाडच्या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. किती गोड, मुलगी आता ऐकत नाही, आम्हाला पण खायला द्या, प्राजक्ता एवढी गोड आहे तर गुलाबजाम किती गोड असतील, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
6/7
प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांच्या शाही लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत चांगलीच चर्चा होती. अनेक राजकीय आणि सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
advertisement
7/7
प्राजक्ता गायकवाड लग्नानंतर आता आपल्या नव्या प्रोजेक्टची कधी घोषणा करते याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'स्मार्ट सुनबाई' या चित्रपटात प्राजक्ता शेवटची दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्राजक्ता गायकवाडच्या संसाराला सुरुवात, सासरी बनवला हा पहिला गोड पदार्थ