TRENDING:

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चा विनर आधीच कळला होता, 17 वर्षांनी आर्या आंबेकरचा मोठा खुलासा

Last Updated:
Arya Ambekar : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम आर्या आंबेकरने 17 वर्षांनी मोठा खुलासा केला आहे. विनर आधीच कळला होता, असं तिने 17 वर्षांनी सांगितलं आहे.
advertisement
1/7
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चा विनर आधीच कळला होता : आर्या आंबेकर
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली आर्या आंबेकर सध्या चर्चेत आहेत. आर्याने आजवर अनेक गाणी गायली आहेत. पण 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून आर्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली होती.
advertisement
2/7
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं पहिलं पर्व 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या पर्वात रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे स्पर्धक TOP 5 मध्ये होते. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या कार्यक्रमाचे परीक्षक होते.
advertisement
3/7
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड ठरली होती. कार्तिकीने आपल्या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे सर्वाधिक मत मिळवत कार्तिकी या पर्वाची विजेती ठरली होती.
advertisement
4/7
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वात शर्यतीत असणाऱ्या आर्या आंबेकरने आता 17 वर्षांनी मोठा खुलासा केला आहे. विनर आधीच कळला असल्याचं आर्या आंबेकर आरपारला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे.
advertisement
5/7
आर्या आंबेकर म्हणाली,"ग्रँड फिनालेचा आमचा एक गंमतीशीर किस्सा आहे. माझ्यात आणि प्रथमेशमध्ये एक अंतर्गत स्पर्धा सुरू होती की आपल्या दोघांत कोण जिंकणार? रिझल्ट जाहीर करताना परिक्षकांच्या एका बाजुला मी होते आणि दुसऱ्या बाजुला प्रथमेश होता. त्यावेळी परिक्षकांनी ती चिठ्ठी उचलली त्याचवेळी आम्हाला विजेत्याचं नाव दिसलं होतं".
advertisement
6/7
आर्या म्हणाली,"त्यावेळी मी आणि प्रथमेश दोघेही खुश झालो होतो की तू पण नाही जिंकला आणि मी पण नाही जिंकले".
advertisement
7/7
आर्या पुढे म्हणाली," विजेता आणि उपविजेता यात काय फरत असतो हेच मुळाच त्यावेळी माहिती नव्हतं. रोहित कार्तिकीला म्हणालाही होता, मग काय झालं तुझ्या ट्रॉफीवर विजेता आणि माझ्या ट्रॉफीवर उपविजेता आहे तर. मी उप खोडलं की मी पण विजेता".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चा विनर आधीच कळला होता, 17 वर्षांनी आर्या आंबेकरचा मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल