Prajakta Mali: 'फुलवंती'नंतर कुठे गायब झाली प्राजक्ता माळी? दिली मोठी अपडेट, 16 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत रंगणार केमिस्ट्री
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Mali Upcoming Project: 'फुलवंती'नंतर प्राजक्ता कोणत्याही सिनेमामध्ये दिसलेली नाही, यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न होते. याच प्रश्नांची उत्तरं प्राजक्ताने दिली आहेत. प्राजक्ताने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
advertisement
1/7

मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्राजक्ताने सूत्रसंचालन, सिनेमे, वेबसीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
advertisement
2/7
तिचं गोड हसणं, मनमोहक बोलणं, तिच्या घायाळ करणाऱ्या अदांमधून प्राजक्ताने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. २०२४ साली प्रदर्शित झालेल्या तिच्या फुलवंती या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. विशेष म्हणजे, याच चित्रपटातून तिने निर्माती म्हणून या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.
advertisement
3/7
पण फुलवंतीनंतर प्राजक्ता कोणत्याही सिनेमामध्ये दिसलेली नाही, यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न होते. याच प्रश्नांची उत्तरं प्राजक्ताने दिली आहेत. काही तासांपूर्वीच प्राजक्ताने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
advertisement
4/7
प्राजक्ताचा कोणताही नवा सिनेमा येत नसून लवकरच एका वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताने तिच्या स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट करत, ती काम करत असलेल्या वेबसीरिजचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.
advertisement
5/7
प्राजक्ता झी5 च्या देवखेळ या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरीही तिच्यासोबत दिसणार आहे. सध्या ते दोघेही सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं प्राजक्ताच्या फोटोमध्ये दिसून आलं.
advertisement
6/7
चंद्रकांत गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेली देवखेळ ही मराठी सीरिज लवकरच झी5 या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्याप या सीरिजची कथा आणि रिलीज डेट समोर आलेली नाही.
advertisement
7/7
दरम्यान, रानबाजारीनंतर ही प्राजक्ताची दुसरी वेबसीरिज असून प्राजक्ताला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali: 'फुलवंती'नंतर कुठे गायब झाली प्राजक्ता माळी? दिली मोठी अपडेट, 16 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत रंगणार केमिस्ट्री