TRENDING:

80 हून अधिक मालिका, 100 चित्रपट; वयाच्या पन्नाशीत लीड रोल अन् बदललं मराठी अभिनेत्याचं आयुष्य

Last Updated:
ज्याला मराठीतील परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं असा हा अभिनेता. ज्याने आतापर्यंत 100 सिनेमांता काम केलं आहे.
advertisement
1/9
80 हून अधिक मालिका,100 चित्रपट;वयाच्या पन्नाशीत लीड रोल,बदललं अभिनेत्याचं आयुष्य
बॉलिवूडमध्ये अभिनेता आमिर खानला मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हटलं जात. तसाच मराठी इंडस्ट्रीतही एक मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. जो उत्तम अभिनेता आहेच पण उत्तम गायक आहे, दिग्दर्शक आणि लेखकही आहे.
advertisement
2/9
असे अनेक मराठी कलाकार आहेत जे वर्षानुवर्ष इंडस्ट्रीत काम करत आहेत. अनेकांना करिअरच्या पहिल्या टप्प्यात यश मिळतं तर अनेक जण अनेक वर्ष या यशाची वाट पाहतात.
advertisement
3/9
मराठीतील या अभिनेत्याच्याबाबतही तसंच काहीसं झालं. पण त्याने काम करणं थांबवलं नाही. त्याने आतापर्यंत तब्बल 80 हून अधिक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. आतापर्यंत 100 सिनेमांत अभिनय केला आहे.
advertisement
4/9
इतके वर्ष सातत्यानं काम करत असताना या अभिनेत्याला अखेर वयाच्या पन्नाशीत सिनेमात पहिला लीड रोल मिळाला आणि त्याचं आयुष्यच नाही तर करिअरही बदललं.
advertisement
5/9
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच प्रसाद ओक. भूमिका लहान असो किंवा मोठी प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. प्रसाद ओक आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करतोय.
advertisement
6/9
अभिनय करत असताना प्रसादने हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव सारख्या सिनेमांचं दिग्दर्शनही केलं. प्रसादचा पन्नासावा वाढदिवस आणि त्याचा शंभरावा सिनेमा देखील काही दिवसांआधी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
advertisement
7/9
वयाच्या पन्नाशीत त्याला धर्मवीर सिनेमात लीड रोल मिळाला. 2022 साली आलेल्या धर्मवीर या बायोपिकमध्ये प्रसाद ओकने ठाण्याचा ढाण्या वाघ आनंद दिघे यांची भूमिका साकारली. त्यांने साकारलेले आनंद दिघे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. 2024 साली या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला.
advertisement
8/9
प्रसाद ओकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास त्याचा अभिनय असलेला 'महापरिनिर्वाण' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे प्रसाद ओकचं दिग्दर्शन असलेला 'भद्रकाली', 'सुटका', 'पठ्ठे बापुराव' हे सिनेमे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
9/9
अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करत असताना प्रसादला त्याच्या बायकोची खंबीर साथ मिळाली. दोघांना दोन मुलं असून एका मुलाचा नुकताच साखरपुडा देखील झाला. वयाच्या पन्नाशीत प्रसादचं सासरा म्हणूनही प्रमोशन झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
80 हून अधिक मालिका, 100 चित्रपट; वयाच्या पन्नाशीत लीड रोल अन् बदललं मराठी अभिनेत्याचं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल