TRENDING:

Priyanka Chopra : 'देसी गर्ल'चा नाद करायचा नाय! आर्ची, गिरीजाला विसरा, प्रियांका चोप्राचे लेटेस्ट PHOTO पाहाच

Last Updated:
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा सध्या आपल्या आगामी 'वाराणसी' सिनेमामुळे चर्चेत आहे. अशातच तिच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.
advertisement
1/7
'देसी गर्ल'चा नाद करायचा नाय!  प्रियांका चोप्राचे लेटेस्ट PHOTO पाहाच
बॉलिवूड अभिनेत्री 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लुक समोर आला होता. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये आयोजित केलेल्या 'वाराणसी'च्या इव्हेंटदरम्यान प्रियांका चोप्रा ट्रेडिशनल लुकमध्ये दिसून आली. या इव्हेंटदरम्यानचे फोटो अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
advertisement
2/7
'वाराणसी' सिनेमाच्या इव्हेंटदरम्यान देसी गर्ल प्रियांका चोप्रा एखाद्या राजकन्येसारखी सजूनधजून पोहोचली होती. प्रियांका चोप्राने आपल्या लुकने सर्वांनाच घायाळ केलं.
advertisement
3/7
प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर इव्हेंटदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये देसी गर्लने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसलेली पाहायला मिळत आहे. मॅचिंग नेकलेस, हातात ब्रेसलेट, बिंदी आणि वेस्ट बेल्टमुळे प्रियांका अधिकच खुलून दिसत आहे.
advertisement
4/7
प्रियांका चोप्राचा साधा लुक सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नेटकरी आणि चाहते सोशल मीडियावर कमेंट्स करत प्रियांकाच्या लुकचं कौतुक करत आहेत.
advertisement
5/7
प्रियांकाच्या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली,"या तर राजकुमारी जॅस्मीन आहेत." तर दुसऱ्याने लिहिलं, "अप्सरा आली... अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे." तिसऱ्या कमेंटमध्ये लिहिलंय,"या लूकमध्ये त्या सर्वात सुंदर दिसत आहेत." तर आणखी एका कमेंटमध्ये लिहिलं होतं,"मी प्रियांकाला पाहतच राहिलो आहे."
advertisement
6/7
प्रियांका चोप्राने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"माझ्यातल्या देवीला सादर करत आहे".
advertisement
7/7
'वाराणसी' या चित्रपटात प्रियांका चोप्रा मंदाकिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या बहुचर्चित सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियांकाने दमदार कमबॅक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priyanka Chopra : 'देसी गर्ल'चा नाद करायचा नाय! आर्ची, गिरीजाला विसरा, प्रियांका चोप्राचे लेटेस्ट PHOTO पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल