IND vs SA : कोलकाता टेस्टनंतर WTC Points Table मध्ये टीम इंडियाला धक्का, साऊथ अफ्रिकाची दुसऱ्या क्रमांकावर झेप!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
WTC Points Table After Kolkata Test : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला. 124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 93 धावांवर ऑलआउट झाला.
advertisement
1/5

कोलकाता कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सायमन हार्मरने सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या अन् भारताला मोठा धक्का दिला.
advertisement
2/5
कोलकाता टेस्टपूर्वी टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यावेळी टीम इंडियाकडे 61.90 टक्केवारी होते. अशातच आता टीम इंडिया 4 थ्या क्रमांकावर घसरली आहे.
advertisement
3/5
टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आली असून संघाकडे 54.17 टक्केवारी असतील. 8 मॅचमध्ये टीम इंडियाने 3 सामने गमावले आहेत.
advertisement
4/5
तर दुसरीकडे साऊथ अफ्रिका कोलकाता टेस्टपूर्वी 50 टक्केवारीसह चौथ्या स्थानावर होती. आता त्यांनी थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीये.
advertisement
5/5
साऊथ अफ्रिकेला या विजयाने मोठं यश मिळालं असून त्यांची टक्केवारी 66.67 झालीये. त्यामुळे साऊथ अफ्रिकेसाठी कोलकाता टेस्ट संजीवनी ठरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : कोलकाता टेस्टनंतर WTC Points Table मध्ये टीम इंडियाला धक्का, साऊथ अफ्रिकाची दुसऱ्या क्रमांकावर झेप!