TRENDING:

OMG! धगधगत्या सूर्यावर माणूस, फोटोग्राफरने टिपलं अद्भुत दृश्य; हे कसं शक्य आहे?

Last Updated:
Man on Sun Photo Viral : धगधगता सूर्य आणि त्यासमोर हा माणूस असा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
1/5
OMG! धगधगत्या सूर्यावर माणूस, फोटोग्राफरने टिपलं अद्भुत दृश्य; हे कसं शक्य आहे?
दुपारच्या वेळेत पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणं आपल्याला बिलकुल सहन होत नाही. उन्हाळ्यात तर उन्हामुळे बेकार अवस्था होते. पृथ्वीपासून इतका लांब असलेला सूर्य पण त्याची किरणं पृथ्वीवर पडून तापमान इतकं वाढतं की यामुळे जीवही जाऊ शकतो. त्यामुळे सूर्यावर जाणं सोडा, तसा विचारही कुणाच्या मनात येणार नाही.
advertisement
2/5
आतापर्यंत माणूस चंद्रावर गेला, आता मंगळावर जाण्याचीही तयारी सुरू आहे. पण सूर्यावर जाण्याचा विचार ज्याला आणखी किती वर्षे लागतील ते सांगू शकत नाही. असं असताना सूर्यावर चक्क एक माणूस दिसला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
advertisement
3/5
हा फोटो पाहिल्यावर खरंच सूर्यावर माणूस आहे का? हे कसं शक्य आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ही फोटोग्राफरची कमाल आहे. एरोझॉनमधील अॅस्ट्रो फोटोग्राफर अँड्र्यू मॅकार्थीने हे सूर्य आणि माणसाचं अद्भुत दृश्य टिपलं आहे.
advertisement
4/5
सूर्यावर दिसणारा हा माणूस प्रत्यक्षात सूर्यावर नाही तर तो स्कायडायव्हिंग करत असताना काढलेला फोटो आहे. हा फोटो काढण्यासाठी खास सौर्य दुर्बिण वापण्यात आली आहे. माणसाचं स्कायडायव्हिंग आणि सूर्य असं एकत्र टिपण्यात आलं आहे.
advertisement
5/5
सूर्यासमोर स्कायडायव्हिंग करणारी व्यक्ती युट्युबर आणि म्युझिशियन गॅब्रिअल सी ब्राऊन आहे.  अँड्र्यू मॅकार्थी आणि ग्रॅब्रिअल सी ब्राऊन या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OMG! धगधगत्या सूर्यावर माणूस, फोटोग्राफरने टिपलं अद्भुत दृश्य; हे कसं शक्य आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल