Raha Kapoor : कपूर खानदानाच्या नातीचा थाटच निराळा, अवघ्या 4 वर्षांच्या राहासाठी सेप्रेट व्हॅनिटी वॅन, काय काय आहे त्यात?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Raha Kapoor:बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंब हे नेहमीच त्यांच्या शाही आणि वेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जाते. मग तो ऋषी कपूर युग असो किंवा आजचा रणबीर कपूरचा काळ.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंब हे नेहमीच त्यांच्या शाही आणि वेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जाते. मग तो ऋषी कपूर युग असो किंवा आजचा रणबीर कपूरचा काळ. पण आता या कुटुंबातील सर्वात लहान सदस्य राहा कपूर हिने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राहाचेहा शाही थाट कमी नाहीत.
advertisement
2/7
रणबीर कपूर आणि आलिया भट्टची ही लाडकी मुलगी अडीच वर्षांची असूनही एका सेलिब्रिटीप्रमाणेच आलिशान जीवन जगते.विशेष म्हणजे, राहाकडे स्वतःची वैयक्तिक व्हॅनिटी व्हॅन आहे. याचा खुलासा राहाचे आजोबा महेश भट्ट यांनी केला आहे. हे ऐकून सर्वच अवाक् झाले.
advertisement
3/7
आलिया भट्ट जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाते तेव्हा राहा हिला तिच्या खास व्हॅनिटी व्हॅनमध्ये ठेवले जाते. या व्हॅनिटीमध्ये लहान मुलांसाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. खेळणी, आरामदायी बेड, खास डिझाइन केलेली खुर्ची आणि राहाच्या आवडीचे पदार्थ सर्व काही तिच्यासाठी तयार असतं.
advertisement
4/7
राहा जरी अडीच वर्षांची असली तरी तिच्या भोवती असलेली सुरक्षा आणि शाही वागणूक बघून चाहते थक्क होतात. आलिया आणि रणबीर दोघेही त्यांच्या मुलीला स्पॉटलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सेटवर राहाची आलिशान एंट्री पाहणाऱ्यांना लगेच जाणवतं की ही छोटी राजकुमारी खरोखरच बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये सर्वात वेगळी आहे.
advertisement
5/7
आलियाचे वडील महेश भट्ट सुद्धा राहाच्या या आलिशान लाइफस्टाइलमुळे थक्क झाले होते. त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की आजच्या पिढीत मुलांना लहानपणापासूनच ज्या सुविधा मिळतात, त्या त्यांच्या काळात कल्पनाही करता आल्या नसत्या. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्टने याविषयी सांगितलं.
advertisement
6/7
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी राहाच्या जन्मानंतर सुरुवातीला काही काळ तिचा चेहरा सार्वजनिकपणे उघड न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रसारमाध्यमांना आणि पापाराझींना विनंती केली होती की, तिच्या बालपणाचा आदर करत तिचे फोटो प्रकाशित करू नयेत.
advertisement
7/7
राहाचे नाव तिची आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी निवडले आहे. नीतू कपूर यांनी हे नाव खूप विचारपूर्वक निवडले असून त्याचे विविध भाषांमध्ये सुंदर अर्थ आहेत. आनंद, शांती असे अनेक अर्थ आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Raha Kapoor : कपूर खानदानाच्या नातीचा थाटच निराळा, अवघ्या 4 वर्षांच्या राहासाठी सेप्रेट व्हॅनिटी वॅन, काय काय आहे त्यात?