IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध सूर्या 'हुकमी एक्का' मैदानात उतरवणार,आशिया कपमध्ये एकही सामना खेळला नाही, Playing XI
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कपच्या सुपर 4 मधला शेवटचा सामना आज भारत आणि श्रीलंका या दोन संघात पार पडणार आहे. या सामन्याला फारसं महत्व नाही पण औपचारीकता म्हणून हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव संघात तीन बदल करण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

आशिया कपच्या सुपर 4 मधला शेवटचा सामना आज भारत आणि श्रीलंका या दोन संघात पार पडणार आहे. या सामन्याला फारसं महत्व नाही पण औपचारीकता म्हणून हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव संघात तीन बदल करण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
खरं तर हा सामना औपचारीक जरी असला तरी फायनलपुर्वी टीम इंडियाला या सामन्यात बेंच स्ट्रेथ पुन्हा तपासण्याची संधी आहे.त्यामुळे सूर्या काही नवीन खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी आराम दिली जाण्याची शक्यता आहे.वर्कलोड मॅनेजमेंटमुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.याचा अर्थ असा की अर्शदीप सिंगला आणखी एक संधी मिळू शकते. अर्शदीप सिंगने ओमानविरुद्ध आशिया कप सामन्यात खेळला होता. या सामन्यात त्याने टी20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा आकडाही पुर्ण केला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला.
advertisement
4/7
जसप्रीत बुमराह सोबत टीम इंडियाचा चायनामॅन कुलदीप यादवला देखील विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी हर्षित राणा याच्या रूपात अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
फलंदाजांमध्ये तिलक वर्माला आराम देऊन रिंकु सिंहला संधी देण्याची शक्यता आहे.रिंकु सिंहने आशिया कपमध्ये एकही सामना खेळला नाही आहे.त्यामुळे सूर्या एकही सामना न खेळलेला खेळाडूला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
संजू सॅमसनलाही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याचीही शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात संजू सॅमसनने फलंदाजी केली नाही.
advertisement
7/7
भारताची संभाव्य इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर)/जितेश शर्मा (विकेटकिपर), तिलक वर्मा/रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव/हर्षित सिंह, वर्चस्व/अक्षर पटेल चक्रवर्ती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध सूर्या 'हुकमी एक्का' मैदानात उतरवणार,आशिया कपमध्ये एकही सामना खेळला नाही, Playing XI