सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या महाभयंकर पावसाने सोलापुरातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. कालपर्यंत उभा असलेले पीक चार दिवसांच्या पावसामुळे जमीनदोस्त झालेत .या पिकांसोबत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील स्वप्न देखील संपुष्टात आलेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव या गावातील बाजीराव मुकणे या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचं अतोनात नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून उभा केलेली द्राक्षाची बाग अक्षरशा जमीनदोस्त झाली आहे.