सोलापूर - सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावात हाहाकार उडाला आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील घोडके वस्ती ही सीना नदीपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असून घोडके वस्तीमध्ये आल्याने वस्तीवरील नागरिकांना संसारोपयोगी साहित्य घेऊन घर सोडावे लागले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे रस्त्यावरच चूल मांडून राहण्याची वेळ घोडके वस्ती येथील ग्रामस्थांची आली आहे.