सोलापूर - काळया मातीत आपले स्वप्न पेरणाऱ्या बळीराजाचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.गुंजेगाव मार्गावर दिगंबर नवत्रे यांनी एका एकरात भुईमूग शेंगाची लागवड केली होती. पण सोलापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एक एकरमध्ये पावसाचं कमरे एवढं पाणी शेतामध्ये आल्याने भुईमुगच्या शेंगा चिखलमय झाले असून जवळपास एक लाख रुपये पर्यंतचे नुकसान दिगंबर यांचे झाले आहे.