TRENDING:

Netflix Horror Movie: 1 तास 59 मिनिटांचा सर्वात भयानक सिनेमा, पाहून थरथर कापाल; नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग

Last Updated:
Netflix Horror Movie: काही कथा आपल्या मनावर खोल ठसा उमटवतात. अशाच एका थरारक चित्रपटाची चर्चा पुन्हा रंगली आहे. दोन वर्षांपूर्वी, 2023 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या ओटीटीवर खळबळ उडवतोय.
advertisement
1/7
1 तास 59 मिनिटांचा सर्वात भयानक सिनेमा, पाहून थरथर कापाल; नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग
काही कथा आपल्या मनावर खोल ठसा उमटवतात. अशाच एका थरारक चित्रपटाची चर्चा पुन्हा रंगली आहे. दोन वर्षांपूर्वी, 2023 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या ओटीटीवर खळबळ उडवतोय.
advertisement
2/7
या सिनेमाची कथा 1980 च्या दशकातील स्पेनमध्ये घडते. कथेत एक तरुण विवाहित जोडपं दिसतं. त्यांना गर्भपाताचा दु:खद अनुभव येतो आणि त्यानंतर ते जुळ्या मुलांना दत्तक घेतात. पण हीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरते.
advertisement
3/7
बाहेरून निष्पाप दिसणारी ही मुलं प्रत्यक्षात धार्मिक अतिरेकी श्रद्धांमध्ये अडकलेली असतात. ते बायबलमधील शिकवणींचा शब्दशः अर्थ घेतात आणि त्या अंमलात आणतात. त्यांचे हे वागणे हळूहळू धोकादायक बनते.
advertisement
4/7
मुलं कुत्र्याला मारतात, विचित्र विधी करतात आणि घरात भीतीचं वातावरण तयार करतात. आईला घरात काहीतरी गंभीर गडबड असल्याचं जाणवतं आणि हळूहळू काळी रहस्यं उलगडत जातात.
advertisement
5/7
दिग्दर्शक रुबिन स्टाइनचा हा पहिलाच फिचर हॉरर असला तरी त्यांनी प्रेक्षकांच्या अंगावार काटा आणण्यात यश मिळवलं आहे. हा एक स्पॅनिश सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट आहे.
advertisement
6/7
चित्रपटात मिलेना श्मिट (लोला), जेमी लोरेंटे (अ‍ॅडॉल्फो), कार्लोस जी. मोरोलेओन (टिन) आणि अनास्तासिया रुसो (टीना) यांच्या भूमिका आहेत. विशेषतः जुळ्या मुलांचा अभिनय आणि छायांकनाचं कौतुक होतंय.
advertisement
7/7
‘Tin & Tina’ ला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. रॉटन टोमॅटोजवर 56% पॉझिटिव्ह रेटिंग आहे. चित्रपटाची गती कधी कधी मंद वाटली असली तरी त्याचा थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. Tin & Tina सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Netflix Horror Movie: 1 तास 59 मिनिटांचा सर्वात भयानक सिनेमा, पाहून थरथर कापाल; नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल