ड्रायव्हिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ट्रकचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती ट्रकमध्ये आहे, जी ड्रायव्हिंग सीटवर आहे पण तिचा डोळा लागला आहे. ती गाढ झोपलेली दिसते आहे. ट्रकमध्ये कॅमेरा आहे, ज्यात ट्रकच्या आतील आणि ट्रकच्या बाहेरी म्हणजे रोडवरील संपूर्ण दृश्य कैद झालं आहे.
advertisement
मदरशाचं बाथरूम उघडलं आणि एकएक करत बाहेर आल्या 40 मुली, तपासानंतर पोलीसही शॉक
ड्रायव्हर झोपला आहे पण ट्रक स्वतःच चालतो आहे. बाजूने काही गाड्याही जातात. ट्रक तसाच सुरू राहतो. मधेच तो रस्त्यावरून अनियंत्रित होतानाही दिसतो. जवळपास एका मिनिटानंतर ड्रायव्हरला जाग आल्याचं दिसतं. त्यावेळी ट्रक हलत असतो. यामुळेच तो हडबडून जागा होतो. ट्रक अनियंत्रित होतो आणि तो रस्त्यावर पलटतो. सुदैवाने ड्रायव्हरला काही होत नाही. कसंबसं करून तो ट्रकमधून बाहेर पडतो. तसंच रस्त्यावर जास्त गाड्याही नव्हत्या. त्यामुळे इतर कोणत्या गाड्यांचा अपघात झालेला नाही. मोठी घटना टळली आहे.
ही संपूर्ण घटना ट्रकच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे आणि आता ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहितीनुसार ही घटना आफ्रिकन देश झिम्बाब्वेमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.