Ram Kapoor Birthday: 'वहिनी... वहिनी' म्हणून तिलाच बनवली बायको, राम कपूरची Filmy Love story!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Ram Kapoor Birthday: टेलिव्हिजनच्या जगातील सुपरस्टार मानला जाणारा अभिनेता म्हणजे राम कपूर. 'बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेने तर त्याला घराघरांत पोहोचवलं आणि त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली.
advertisement
1/7

टेलिव्हिजनच्या जगातील सुपरस्टार मानला जाणारा अभिनेता म्हणजे राम कपूर. 'बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेने तर त्याला घराघरांत पोहोचवलं आणि त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/7

राम कपूरचा आज 1 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. आता तो त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने त्याची लव्हस्टोरी जाणून घेऊया.
advertisement
3/7
राम कपूरने अभिनेत्री गोतमी गाडगीळसोबत लग्न केलं. त्यांची लव्हस्टोरी फारच फिल्मी आहे. त्यांची पहिली भेट ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवर झाली. गौतमी त्या काळी मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात नाव कमावत होती.
advertisement
4/7
वयाच्या 16 व्या वर्षीच ती ग्लॅमरस मॉडेल म्हणून ओळखली जात होती. उंच बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची चमक गौतमी वेगळीच भासत होती. दुसरीकडे, राम कपूरही स्मार्ट आणि हॅण्डसम हिरो म्हणून लोकप्रिय होत होता.
advertisement
5/7
दोघांची भेट झाली ‘घर एक मंदिर’च्या सेटवर झाली आणि याच मालिकेत गौतमीने रामची वहिनीची भूमिका साकारली होती, पण कथा पुढे गेली आणि ऑन-स्क्रीनच ती त्याची पत्नी बनली. प्रेक्षकांना त्यांची ही जोडी इतकी भावली की चाहत्यांनी त्यांना खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहावं, अशी इच्छा व्यक्त केली.
advertisement
6/7
पण गौतमीच्या आयुष्यात राम अगोदर छायाचित्रकार मधुर श्रॉफ होते. दोघांचं लग्नही झालं होतं. मात्र हे लग्न जास्त काळ टिकले नाही. गैरसमज आणि दुरावा वाढल्याने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/7
राम आणि गौतमीचं खरं नातं हळूहळू घट्ट होत गेलं. एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर त्यांना जाणवलं ते एकमेकांसाठीच बनले आहेत. आणि मग 2003 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आज राम कपूर आणि गौतमी दोन मुलांचे आई-वडील आहेत. मुलगी सिया आणि मुलगा अक्स यांच्या फोटोंनी त्यांचे इंस्टाग्राम खाते भरलेलं असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ram Kapoor Birthday: 'वहिनी... वहिनी' म्हणून तिलाच बनवली बायको, राम कपूरची Filmy Love story!