आता सरकारकडून महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा मिळून 3 हजार रुपयांचा हप्ता एकत्रितपणे या महिन्यात जमा होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ऑगस्टचा हप्ता खात्यात न आल्याने महिलांची निराशा वाढली होती. सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, असं सांगितलं होतं. मात्र, सप्टेंबरची रक्कमही अद्याप आली नसल्याने अनेक महिला चिंतेत होत्या.
advertisement
अजूनही काही अर्जांची स्क्रुटीनी सुरू आहे. मागच्या काळी काळात नियमांना केराची टोपली दाखवून लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढली होती. या सगळ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून अर्जांची फेरतपासणी केली जात आहे. त्यामध्ये आतापर्यंत तब्बल 26 लाख अर्ज अपात्र ठरले आहेत. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
काही लाभार्थींना अजूनही बँक खात्याचा प्रश्न आहे. ज्या महिलांचे स्वतःचे खाते नाही, त्यांना घरातील पुरुषांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे अशा महिलांनाही थोडा उशीर झाला आहे. लाडकी बहिण योजनेच्या सुरुवातीला तब्बल 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती. पडताळणी झाल्यानंतर हा आकडा 2 कोटी 44 लाखांवर आला आहे. मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्यामुळे आणि डेटा पडताळणीमुळे काहीसा उशीर झाला असला, तरी दोन महिन्यांचा एकत्र हप्ता जमा झाल्यास महिलांना दिलासा मिळणार आहे. दोन्ही महिन्याचे हप्ते या महिन्यात एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र हा हप्ता कधी मिळणार याची अद्याप तारीख समोर आली नाही.