Mumbai Weather: मुंबईतील हवामानात मोठे बदल, कोकणात पावसाच्या सरी कोसळणार, पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळत होता. परंतु आज मुंबईकरांना थोडा दिलासा मिळेल.
advertisement
1/5

सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाच्या जोरदार उपस्थितीने झाली होती. गेल्या आठवडाभर मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांना कधी यलो तर कधी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मुसळधार पावसाने अनेक भागांमध्ये पाणी साचले, वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आणि नागरिक त्रस्त झाले होते. परंतु आजचे हवामान तुलनेने शांत आणि स्थिर राहणार आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की 8 सप्टेंबर रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाही. तरीदेखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, तर काही भागांत आकाश फक्त ढगाळ राहील.
advertisement
2/5

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळत होता. परंतु आज मुंबईकरांना थोडा दिलासा मिळेल. आज शहरात केवळ अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींचा अनुभव येईल. मुसळधार पावसाचा धोका नाही. सकाळपासूनच हवामान ढगाळ राहील, तर दुपारी आणि रात्री काही ठिकाणी सरी पडण्याची शक्यता आहे. तापमान 26 अंश सेल्सिअस किमान आणि 31अंश सेल्सिअस कमाल असेल. वाऱ्याचा वेग 15 ते 18 किमी प्रतितास नोंदवला जाईल. त्यामुळे नागरिकांनी हलक्या पावसाची तयारी ठेवावी, परंतु मोठ्या अडचणी निर्माण होणार नाहीत.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे या भागांमध्ये हवामान परिस्थिती मुंबईसारखीच राहील. सकाळी आकाश ढगाळ राहील, अधूनमधून हलक्या सरी होतील, तर दुपारी काही भागांत पावसाचा जोर थोडा वाढेल. मुसळधार पावसाचा धोका नसला तरी काही भागांत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर वाऱ्याचा वेग सुमारे 17 किमी प्रतितास असेल.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्याला मागील तीन दिवसांपासून सतत अलर्ट होता, परंतु आज अलर्ट नाही. जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल तर काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. तापमान 24 ते 29 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गया कोकण किनारपट्टीवरील तिन्ही प्रमुख जिल्ह्यांना देखील आज कोणताही अलर्ट नाही. तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे. किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल. वाऱ्याचा वेग 18–20किमी प्रतितास नोंदवला जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather: मुंबईतील हवामानात मोठे बदल, कोकणात पावसाच्या सरी कोसळणार, पाहा आजचं हवामान