Chai : चहा पिण्यापूर्वी की प्यायाल्यानंतर पाणी कधी प्यायचं? अनेक लोक करतात ही चूक, आताच समजून घ्या सायन्स
- Published by:Devika Shinde
Last Updated:
“चहा पिण्यापूर्वी पाणी पिऊ नये” किंवा “चहानंतर पाणी पिणं वाईट असतं.” पण खरे काय? कोण बरोबर आणि कोण चुकीचं? चला, विज्ञानाच्या आधारावर समजून घेऊया की चहापूर्वी आणि चहानंतर पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो.
advertisement
1/10

“चहा पिण्यापूर्वी पाणी पिऊ नये” किंवा “चहानंतर पाणी पिणं वाईट असतं.” पण खरे काय? कोण बरोबर आणि कोण चुकीचं? चला, विज्ञानाच्या आधारावर समजून घेऊया की चहापूर्वी आणि चहानंतर पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो.
advertisement
2/10
सकाळची सवय आणि चहाचे आकर्षणभारतातील बहुतांश लोकांची सकाळ “एक कप चहा” शिवाय सुरूच होत नाही. काहींना झोप उडवण्यासाठी, काहींना सवयीने, तर काहींना फक्त मन ताजेतवाने ठेवण्यासाठी चहा आवश्यक असतो. पण रिकाम्या पोटी किंवा चुकीच्या वेळी घेतलेला चहा कधी कधी शरीरासाठी हानिकारक ठरतो.
advertisement
3/10
चहापूर्वी पाणी प्यायल्याने काय होतं?एक्स्पर्ट्सच्या मते, चहा पिण्यापूर्वी थोडे कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर असते. कारण: सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीरातील पचनक्रिया मंद असते. अशा वेळी थोडं पाणी घेतल्याने शरीर हायड्रेट होतं आणि पचन संस्थेला जाग येते.
advertisement
4/10
यामुळे पोट रिकामं राहत नाही, त्यामुळे चहातील कॅफिन थेट आम्लपित्त (acid reflux) निर्माण करत नाही.कोमट पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यात मदत करतं आणि दिवसभरातील ऊर्जा वितरण योग्य ठेवतं.
advertisement
5/10
जर तुम्ही सकाळी उठून सरळ चहा पिता, तर काही वेळात तुम्हाला गॅस, अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ जाणवू शकते. पण जर तुम्ही आधी एक ग्लास कोमट पाणी घेतलं, तर हा त्रास टाळला जाऊ शकतो.
advertisement
6/10
चहानंतर लगेच पाणी पिणं का टाळावं?हे बरेच लोक करतात, चहा घेतला आणि लगेच एक ग्लास पाणी पितात. पण हे टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.चहानंतर लगेच पाणी पिल्यास तोंडातील आणि अन्ननलिकेतील तापमानातील फरकामुळे थर्मल शॉक होतो.यामुळे दातांमध्ये झिणझिण्या, दातांची संवेदनशीलता आणि कधी कधी नाकातून रक्तस्राव किंवा घशाला त्रास देखील होऊ शकतो.गरम चहानंतर थंड पाणी घेतल्यास पोटात अन्न आणि चहा एकत्र होऊन अपचन किंवा उलटी होऊ शकते.
advertisement
7/10
म्हणूनच चहा घेतल्यानंतर किमान अर्धा तास पाणी पिऊ नये. जर खूप तहान लागली असेल तर थोडंसचं किंवा कोमट पाणी घ्या.
advertisement
8/10
किती चहा योग्य?विज्ञान सांगतं की दिवसातून दोन वेळा पेक्षा जास्त चहा घेणं शरीरावर विपरित परिणाम करु शकतं. जास्त कॅफिनमुळे झोप कमी होते, पोटात आम्लपित्त वाढतं आणि शरीर निर्जलीकृत (dehydrated) होतं.
advertisement
9/10
काय करावं ?सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घ्या.चहा रिकाम्या पोटी न घेता हलकं काहीतरी खा.दिवसात दोनपेक्षा जास्त कप चहा टाळा.
advertisement
10/10
काय टाळावं?चहानंतर लगेच थंड पाणी पिणं.रिकाम्या पोटी चहा घेणं.वारंवार गॅस किंवा अॅसिडिटी होत असेल तरी चहावर अवलंबून राहणं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chai : चहा पिण्यापूर्वी की प्यायाल्यानंतर पाणी कधी प्यायचं? अनेक लोक करतात ही चूक, आताच समजून घ्या सायन्स