TRENDING:

महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, सोमवारी 22 जिल्ह्यांत वादळी पाऊस; IMD कडून अलर्ट

Last Updated:
27 ऑक्टोबर रोजीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात, 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील?
advertisement
1/6
महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, सोमवारी 22जिल्ह्यात वादळी पाऊस; IMDकडून अलर्ट
गेल्या तीन ते चार दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. 27 ऑक्टोबर रोजीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात, 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील?
advertisement
2/6
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/6
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/6
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. यासर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/6
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तीन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/6
27 ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. विजांचा कडकडाट होत असताना बाहेर पडू नये. पाऊस आणि वादळ असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, सोमवारी 22 जिल्ह्यांत वादळी पाऊस; IMD कडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल