नाशिकच्या निफाडमधल्या द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. दोन दिवसा पासून होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात सापडलेत.या पावसामुळं सुमारे 50 ते 60 टक्के पेक्षा जास्त द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या.सतत होत असलेल्या पावसामुळे द्राक्षे घडावर परिणाम झाला आहे अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळ सडू लागल्यामुळे बागायतदार हतबल झाले आहे
advertisement
गेल्या महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीतुन शेतकरी सावरलेला नसताना आता त्याच्यावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट कोसळलंय. चांदवड,मनमाडसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.निसर्गाने उरलीसूरली पिके देखील हातातून हिरावून घेतल्यामुळे बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे.
शिरूर तालुक्यात झालेल्या पावसामुळं शेतात तळं साचल्यासारख चित्र दिसून आलं.. यामुळं कांदा पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकांचं मुळाजवळ पाणी साचल्यानं पीक कुजून जाण्याची शक्यता आहे.शहापूर आणि पालघर भागात पावसामुळे शेतात कापून ठेवलेली भात पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत.पावसामुळे झाकून ठेवलेल्या भात पिकाला कोंब फुटू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे...ऐन दिवाळी सणात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. सध्या जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली धान पिकं कापून शेतात वाळवण्यासाठी ठेवली होती.मात्र,परतीच्या पावसाने हे सर्व धान पीकं ओलं झालं. धान ओला झाल्यानं आता त्यातून अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिंगोली कापसाचं नुकसान
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वेचणीस आलेल्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे...आधीच शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेलं.त्यात आता कापसावर शेतकऱ्यांची मदार होती परंतु हा कापूस देखील भिजून ओला झाला आहे.कापूस पिवळा पडून आता काळवंडायला सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला
पुढील काही दिवस पावसाच्या सरी कोसळल्याचा अंदाज असल्यामुळं बळीराजाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत .वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून सरकारनं मदत करावी अशी मागणी केली जात आहे
