मक्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 10 हजार 536 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 4 हजार 540 क्विंटल लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1338 ते जास्तीत जास्त 1588 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बीड मार्केटमध्ये आवक झालेल्या 50 क्विंटल मक्यास 2000 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात रविवारचा दिवस जोरदार पावसाचा, 22 जिल्ह्यांना अलर्ट
पांढऱ्या कांद्यास चांगला दर
राज्याच्या मार्केटमध्ये 68 हजार 071 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 39 हजार 875 क्विंटल सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 333 ते जास्तीत जास्त 1800 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 785 क्विंटल पांढऱ्या कांद्यास प्रतीनुसार कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 3500 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.
सोयाबीन आवक वाढली मात्र दर दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 37 हजार 723 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 53 हजार 326 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3826 ते 4300 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये 15000 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 3575 ते 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





