खरं तर आज भारत आणि बांग्लादेश यांच्यातला साखळी फेरीतला शेवटचा सामना खेळवला गेला.हा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात प्रतिका रावलला कॅच पकडताना दुखापत झाली आहे,त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. प्रतिका रावल टीम इंडियाची सलामीवीर आहे, ती स्मृतीसोबत भारताच्या डावाची सुरूवात करते.तसेच ती या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.त्यामुळे सेमी फायनलच्या तोंडावर टीम इंडियाला हा मोठा फटका आहे.
advertisement
बीसीसीआय प्रतिका रावलच्या हेल्थ अपडेट बाबत माहिती देताना सांगितले की,
टीम इंडियाची अष्टपैलू प्रतिका रावलला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना गुडघा आणि घोट्याला दुखापत झाली. बीसीसीआयची वैद्यकीय टीम तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.त्यामुळे टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे.
सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानी
भारताची 25 वर्षीय स्टार फलंदाज प्रतीका 2025 महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांमध्ये तिने 308 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक आहे. स्मृती मानधना 350 धावांसह यादीत अव्वल स्थानावर आहे.
आता 30 ऑक्टोबर रोजी भारताचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. या सामन्याला अजून तीन दिवसांचा वेळ आहे. या दरम्यान जर प्रतिका रावल जर फीट झाली तर टीम इंडियाला दिलासा नाहीतर त्यांना मोठा फटका बसणार आहे.
