TRENDING:

Ramayana Teaser च्या शेवटच्या सीनने उत्सुकता वाढवली; राम रणबीर मग रावण कोण? पाहा सातवा Photo

Last Updated:
Ramayana Teaser Ram Ravana : रामायण फिल्मचा टिझर पाहिल्यानंतर रणबीर कपूरला रामाच्या अवतारात पाहण्याची प्रतीक्षा संपली पण आता रावणाचा लूकने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
advertisement
1/7
Ramayana Teaser च्या शेवटच्या सीनने उत्सुकता वाढवली; राम रणबीर मग रावण कोण? पाहा सातवा Photo
बहुप्रतीक्षित रामायण फिल्मचा टिझर अखेर रिलीज झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी रामायण सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे.
advertisement
2/7
टिझरमध्ये रामाचं रूप दाखवण्यात आलं आहे. रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसतोय. गेल्या अनेक दिवसांपासून रणवीरला रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर होते. अखेर त्याचा पहिला लूक समोर आला आहे.
advertisement
3/7
2 मिनिटे 38 सेकंदांचा हा टीझर. ज्यात राम, लक्ष्मण, सीता दाखवण्यात आल्या आहेत. संपूर्ण व्हिडिओमध्ये रणबीर कपूरच्या 17 फ्रेम्स आहेत. पण शेवटच्या एका फ्रेमने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
4/7
टीझरच्या शेवटी रावणाची एक झलक दाखववण्यात आली आहे. डोक्यावर मुकुट, सोन्याची लंका, अतिशय सुंदरपणे डिझाइन केलेला त्याचा ड्रेस आणि तो पुष्पक विमानाकडे चालत जाताना दिसतो आहे.
advertisement
5/7
पण त्याचा चेहरा दाखवलेला नाही. तो पाठमोरा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे रावणाच्या भूमिकेत कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
6/7
काही काळापूर्वी नमित मल्होत्राने रामायणचा इंट्रोडक्शन व्हिडीओ शेअर केला होता. तसंच रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानेही त्याच्या सोशल मीडियावर पोस्टर शेअर केलं होतं. दरम्यान आता टिझरचा शेवट नीट पाहाल तर तुम्हाला रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव दिसेल.
advertisement
7/7
रामायण फिल्ममध्ये रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे यश.  KGF 2 नंतर यशचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. टॉक्सिक यावर्षी 19 मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र धुरांधर 2 मुळे तो चित्रपट पुढे ढकलण्यात आला. ही फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. पण सोबत यशची 'रामायण' ही फिल्मही याच वर्षी प्रदर्शित होत आहे. आता यशचा रावण अवतार पाहण्याची लोक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ramayana Teaser च्या शेवटच्या सीनने उत्सुकता वाढवली; राम रणबीर मग रावण कोण? पाहा सातवा Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल