TRENDING:

VIROSH Wedding : 10:10 चा मुहूर्त साधला! वरमाला, मंगळसूत्र सगळ्या विधी झाल्या; तरी रश्मिका-विजय पुन्हा करणार लग्न

Last Updated:
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं उदयपूरमध्ये लग्न झालं आहे. पारंपरिक पद्धतीनं त्यांचं लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
1/8
10:10 चा मुहूर्त साधला! सगळ्या विधी झाल्या; तरी रश्मिका-विजय पुन्हा करणार लग्न
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या शाही लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर रश्मिका आणि विजय लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरमधील आयटीसी मेमेंटोस येथे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना याचं शाही लग्न पार पडलं. 
advertisement
2/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे पारंपारिक विधींनुसार लग्नबंधनात अडकले आहे. लग्न लागलं आणि वरमाला घालताना दोघांना अश्रू अनावर झाले. लग्नाआधी 24 फेब्रुवारी रोजी संगीत नाईट आणि हळद देखील पार पडली.
advertisement
3/8
रश्मिका आणि विजय  यांनी सकाळी 10:10 मिनिटांनी लग्न केलं. दोघांचं लग्न हे तेलुगु रितीरिवाजांनुसार झालं. त्यानंतर आता दुपारी चार वाजता रश्मिका आणि विजय सनसेट वेडिंग होणार आहे.  रश्मिका आणि विजय यांनी तेलुगु रितीरिवाजांनुसार लग्न केलं आहे. 
advertisement
4/8
रश्मिका आणि विजय यांनी अत्यंत खाजगी पद्धतीनं लग्न केलं आहे. लग्नाला मोजके मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी हजरे लावली. लग्नाला संदीप रेड्डी वांगा आणि थरुन भास्कर यांनी उपस्थित लावली.
advertisement
5/8
लग्नानंतर रश्मिका आणि विजयच्या मित्रांनी पापाराझी, मीडिया आणि आयटीसी मोमेंटोसच्या बाहेर जमलेल्या लोकांना मिठाई वाटली. विरल भयानीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 
advertisement
6/8
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवेराकोंडा हे उदयपूरमध्ये लग्न करणारे पहिलं सेलिब्रेटी कपल नाही. याआधी कतरिना कैफ-विक्की कौशल, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही राजस्थानमध्ये लग्न केलं. रश्मिका आणि विजय यांनी सनसेट वेडिंगचा ट्रेंड पुढे सुरू ठेवला. 
advertisement
7/8
रश्मिका आणि विजय यांनी त्यांचं रिलेशन अनेक वर्ष सीक्रेट ठेवलं होतं. विरोष असा हॅशटॅग शेअर करत अखेर लग्नाच्या काही दिवस आधी त्यांनी ऑफिशिअल केलं. उदयपूरमधील लग्नानंतर चार मार्चला  हैदराबादमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे. ज्यामध्ये दक्षिण आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रमुख कलाकार उपस्थित राहणार आहेत. 
advertisement
8/8
 लग्नाआधी संगीत सोहळ्यात रश्मिकानं 'पुष्पा 2' चित्रपटातील अंगारो गाण्यावर डान्स करत विजयला इंप्रेस केलं. दोघांचा वेगळात स्वॅग पाहायला मिळाला. विजयच्या आईने रश्मिकाला वारसाहक्काने बांगड्या भेट दिल्या. रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतूर आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
VIROSH Wedding : 10:10 चा मुहूर्त साधला! वरमाला, मंगळसूत्र सगळ्या विधी झाल्या; तरी रश्मिका-विजय पुन्हा करणार लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल