Virosh Wedding : होणार सून मी या घरची! लग्नानंतर 15 कोटींच्या बंगल्यात जाणार रश्मिका, विजयच्या Luxury House चे Inside Photo
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda House : रश्मिका मंदानाचं सासर म्हणजे विजय देवरकोंडाचं घर म्हणजे आलिशान महलासारखाच आहे. घरातील प्रत्येक कोपरा खास आहे.
advertisement
1/11

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा आज लग्नसोहळा आहे. उदयपूरमध्ये लग्नानंतर हैदराबादमध्ये एका हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी होणार असल्याची माहिती आहे.
advertisement
2/11
रश्मिका आणि विजय दोघं उदयपूरमध्ये लग्न करत असले तरी दोघंही साऊथ इंडियन आहेत. विजयचं घर हे हैदराबादमध्ये आहे. घर कसलं आलिशान महलच म्हणा. लग्नानंतर रश्मिकाची डोली इथंच जाणार आहे.
advertisement
3/11
ज्युबिली हिल्समध्ये हे घर आहे. हैदराबादमधील हा पॉश एरिया. इथं अनेक साऊथ सुपरस्टारचं घर आहे. त्यापैकी एक विजय. आजूबाजूला हिरवळ, उंच सीमा भिंत आणि शांत वातावरण यामुळे ते ज्युबिली हिल्समधील सर्वात खास घरांपैकी एक आहे.
advertisement
4/11
माहितीनुसार विजयने 2019 साली हे घरखरेदी केलं होतं. रिपोर्टनुसार विजयच्या घराची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे.
advertisement
5/11
विजय आपल्या या घरातून स्वत:चे आणि कुटुंबासोबतचे फोटो सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. तो या घरात आई माधवी, बाबा गोवर्धन राव, भाऊ आनंद आणि त्यांचा पाळीव कुत्रा स्टॉर्मसह राहतो.
advertisement
6/11
विजयच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची उत्कृष्ट आणि किमान सजावट. घरातील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक डिझाइन केली गेली आहे. पांढऱ्या रंगाच्या थीमवर आधारित हे घर ज्यात सौम्य लाइट्समुळे घराला एक अतिशय सुंदर लूक मिळतो.
advertisement
7/11
घराचा लेआउट ओपन, खिडक्या मोठ्या आहेत. ज्यामुळे प्रत्येक खोलीत भरपूर प्रकाश आणि हवा येते, आरामदायी वाटतं.
advertisement
8/11
इंटीरियर डिझाइनच्या बाबतीत विजयने मिनिमलिस्ट आणि क्लासिक शैली निवडली. मॉडर्न फर्निचर आहे. बहुतेक खोल्यांमध्ये लाकडी फरशी आहे, जी त्याचं सौंदर्य अधिक वाढवते.
advertisement
9/11
लिव्हिंग रूमपासून बेडरूमपर्यंत विजयच्या घराचा प्रत्येक कोपरा उत्कृष्ट आहे. प्रत्येक गोष्ट शाही फिलिंग देते.
advertisement
10/11
विजय देवरकोंडाचं घर अद्भुत कलाकृतींनी भरलेले आहे. त्याची वैयक्तिक फोटो फ्रेम नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेईल.
advertisement
11/11
विजयच्या या व्हिलामध्ये आराम करण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी भरपूर मोकळी जागा आहे. घरात एक जीम, सुंदर टेरेस गार्डन आहे. जिथून शहराचं विहंगम दृश्य दिसतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Virosh Wedding : होणार सून मी या घरची! लग्नानंतर 15 कोटींच्या बंगल्यात जाणार रश्मिका, विजयच्या Luxury House चे Inside Photo