TRENDING:

Rishi Kapoor: ऋषी कपूरचं अफाट स्टारडम, 20 अभिनेत्रींना केलेलं लॉन्च; त्यांच्यासोबत डेब्यू म्हणजे हमखास हिट

Last Updated:
Rishi Kapoor : आज बॉलिवूडमध्ये शाहरुख खानला "किंग ऑफ रोमान्स" म्हटलं जातं. पण खरं सांगायचं तर, ही पदवी सर्वात आधी मिळवणारे होते ऋषी कपूर.
advertisement
1/7
ऋषी कपूर स्टारडम, 20 अभिनेत्रींना केलेलं लॉन्च; त्यांच्यासोबत डेब्यू म्हणजे हिट
आज बॉलिवूडमध्ये शाहरुख खानला "किंग ऑफ रोमान्स" म्हटलं जातं. पण खरं सांगायचं तर, ही पदवी सर्वात आधी मिळवणारे होते ऋषी कपूर. त्यांच्या डोळ्यांतून झळकणारी निरागसता, गालावरचं गोड हास्य आणि पडद्यावरचा चार्म यामुळे ते 70 च्या दशकापासून लाखो चाहत्यांच्या हृदयात विराजमान झाले.
advertisement
2/7
ऋषी कपूर यांनी त्यांच्या वडिलांच्या 'मेरा नाम जोकर' या क्लासिक चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
advertisement
3/7
फक्त 21 व्या वर्षी त्यांनी डिंपल कपाडियासोबत 'बॉबी' या ब्लॉकबस्टरमधून मुख्य नायक म्हणून एंट्री केली. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण केला आणि चित्रपट हिट ठरला.
advertisement
4/7
ऋषी कपूर यांचं स्टारडम इतकं प्रचंड होतं की त्यांनी तब्बल 20 अभिनेत्रींचं करिअर घडवलं. या यादीत डिंपल कपाडिया, जया प्रदा, रंजीता कौर, झेबा बख्तियार, शोमा आनंद, राधिका कपूर, भावना भट्ट यांसारखी अनेक नावं आहेत.
advertisement
5/7
नवोदित अभिनेत्रींसाठी "ऋषी कपूरसोबत काम केलं" हेच मोठं लाँचिंग पॅड होतं. 70 ते 90 च्या दशकात ‘रफू चक्कर’, ‘लैला मजनू’, ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘हम किसीसे कम नहीं’, ‘चांदनी’, ‘नगीना’, ‘दिवाना’, ‘बोल राधा बोल’ असे एकापेक्षा एक हिट चित्रपट त्यांनी दिले.
advertisement
6/7
पडद्यावर त्यांचा गिटार, रंगीबेरंगी स्वेटर्स आणि प्रेमगीतं ही त्यांच्या इमेजची ओळख बनली. खरंच, शाहरुखच्या आधीचा खरा "किंग ऑफ रोमान्स" ऋषी कपूरच होते.
advertisement
7/7
दरम्यान, आयुष्याच्या शेवटी ऋषी कपूर यांनी रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया) विरुद्ध मोठा लढा दिला. 30 एप्रिल 202 रोजी, वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं जाणं ही संपूर्ण बॉलिवूडसाठी मोठी पोकळी ठरली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rishi Kapoor: ऋषी कपूरचं अफाट स्टारडम, 20 अभिनेत्रींना केलेलं लॉन्च; त्यांच्यासोबत डेब्यू म्हणजे हमखास हिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल