TRENDING:

ऋषी कपूरची ती फ्लॉप, त्यावर बनले 2 सिनेमे, रिलीज होताच रेकॉर्ड ब्रेक; झाले सुपर ब्लॉकबस्टर

Last Updated:
Reincarnation based Bollywood Movies : एखादी फिल्म फ्लॉप झाली की डायरेक्टर, राइटर त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. पण ऋषी कपूर यांचा असा एक सिनेमा जो फ्लॉप ठरला. पण एका दिग्दर्शकानं हिंमत करून याच फ्लॉप सिनेमाचे दोन सिनेमे काढले आणि दोन्ही सिनेमा सुपर ब्लॉकबस्टर ठरले. दोन्ही सिनेमांनी रिलीज होताच रेकॉर्ड ब्रेक केलेत. 
advertisement
1/8
ऋषी कपूरची ती फ्लॉप, त्यावर बनले 2 सिनेमे; रिलीज होताच  ब्लॉकबस्टर
काही चित्रपटांच्या कथा या काळाच्या पुढे असतात, कधी कधी प्रेक्षक तो सिनेमा स्वीकारतात तर अनेकदा तो सिनेमा नाकारला जातो. 1980 मध्ये कर्ज हा सुभाष घई यांचं दिग्दर्शन असलेला सिनेमा रिलीज झाला. सिनेमाचं म्युझिक उत्तम होतं पण सिनेमा फ्लॉप ठरला. पुढे या सिनेमाला प्रेरित होऊन दोन सिनेमे तयार करण्यात आले जे बॉक्स ऑपिसवर सुपरहिट ठरले. 
advertisement
2/8
सुभाष घईंच्या 'कर्ज' या सिनेमाची मळ कथा 1995 साली आलेल्या राकेश रोशन यांच्या 'करण अर्जुन' सिनेमात आहे. त्यानंतर ती फरहा खानने 2007 साली आलेल्या तिच्या 'ओम शांती ओम' सिनेमात कॉपी केली. दोन्ही सिनेमे हिट ठरले. 
advertisement
3/8
1980 साली आलेल्या कर्ज सिनेमात ऋषी कपूर, सिमी ग्रेवाल, राज किरण आणि प्रेमनाथ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. डॉ. राही मासूम रझा यांनी कथा आणि संगीत सचिन भौमिक यांनी दिले होते आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले होते. आनंद बक्षी यांची गाणी होती.
advertisement
4/8
'ओम शांती ओम', 'एक हसीना थी, एक दीवाना था' आणि 'मैं सोलाह बरस' ही तीन गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा काळाच्या पुढच्या सिनेमा त्यामुळे कदाचित तो प्रेक्षकांना आवडला नाही, असं घई यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 
advertisement
5/8
'कर्ज' 15 वर्षांनी  निर्माते राकेश रोशन यांनी पुनर्जन्माच्या कथेवर आधारित चित्रपट 'करण अर्जुन'  हा सिनेमा आणला. 1995 साली रिलीज झालेल्या या अ‍ॅक्शन सिनेमात शाहरुख खान, सलमान खान, राखी सावंत, काजोल, ममता कुलकर्णी, अमरीश पुरी, रणजीत आणि अशोक सराफ प्रमुख भूमिकेत होते. सिनेमात सात गाणी होती.  
advertisement
6/8
'करण अर्जुन' चित्रपटाची कथा सचिन भौमिक, रवी कपूर आणि अन्वर खान यांनी लिहिली होती. 'कर्ज'ची पटकथाही त्यांनीच लिहिली होती.  
advertisement
7/8
करण आणि अर्जुनच्या 12 वर्षांनी शाहरुख खानने ओम शांती ओम या पुनर्जन्माच्या कथेवर आधारित सिनेमा केला. 2007 साली रिलीज झालेल्या या सिनेमात दीपिका पादुकोण, शाहरुख, अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे आणि किरण खेर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 
advertisement
8/8
ओम शांती ओममध्ये विनोद, सस्पेन्स आणि ड्रामा सगळंच होतं. संगीत विशाल शेखर यांचं होतं तर गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली होती. 40 कोटी बजेट असलेल्या या सिनेमानं जगभरात 149 कोटींची ब्लॉकबस्टर कमाई केली होती. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऋषी कपूरची ती फ्लॉप, त्यावर बनले 2 सिनेमे, रिलीज होताच रेकॉर्ड ब्रेक; झाले सुपर ब्लॉकबस्टर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल