TRENDING:

रितेश भाऊ करतोय 'बिग बॉस मराठी 6'ची तयारी? पहिला प्रोमो आऊट होताच लेटेस्ट फोटोशूट व्हायरल, PHOTOS

Last Updated:
Riteish Deshmukh PHOTOS : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या रितेश देशमुखच्या लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
1/7
रितेश भाऊ करतोय 'बिग बॉस मराठी 6'ची तयारी? लेटेस्ट फोटोशूट व्हायरल
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या तीन गोष्टींमुळे चर्चेत आहे. रितेशचा 'मस्ती 4' हा चित्रपट थिएटरमध्ये धमाका करत आहे. दुसरीकडे 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. अशातच 'बिग बॉस मराठी सीझन 6'चा पहिला प्रोमो आऊट झाल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.
advertisement
2/7
रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा होस्ट होता. रितेशने 'भाऊचा कट्टा' चांगलाच गाजवला. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्येही रितेश धुराळा करणार का? याकडे 'बिग बॉस'प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
advertisement
3/7
एकीकडे 'बिग बॉस मराठी 6'चा पहिला प्रोमो आऊट झालेला असताना दुसरीकडे रितेश देशमुखने आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रितेशचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
4/7
रितेश देशमुखने डेनिम लुकमधील फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्येही 'डेनिम मूड, गूड मूड' असं लिहिलं आहे. त्याच्या या लेटेस्ट फोटोशूटवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
advertisement
5/7
रितेशने डेनिम कॉर्ड सेटमधील फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाचं टी-शर्ट, डेनिम पँट-शर्ट, हटके गॉगल आणि शूज असा लुक रितेश देशमुखने केला आहे. त्याच्या या डेनिम कॉर्ड सेटवरील स्टार्स मात्र लक्ष वेधून घेणारे आहेत.
advertisement
6/7
रितेश देशमुखच्या या फोटोशूटवर मराठी माणूस, भाऊचा विषय लय भारी, लातूरचा वाघ, एकदम कडक, नव्या सिनेमाची प्रतीक्षा, आपला भाऊ हार्ड आहे बॉस, बिग बॉस... बिग बॉस, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
advertisement
7/7
रितेश देशमुखचा आगामी 'राजा शिवाजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तसेच 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन रितेश भाऊने होस्ट करावा अशी इच्छाही चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रितेश भाऊ करतोय 'बिग बॉस मराठी 6'ची तयारी? पहिला प्रोमो आऊट होताच लेटेस्ट फोटोशूट व्हायरल, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल