TRENDING:

'द्रौपदी'ची दर्दभरी कहाणी, अभिनेत्रीने तीन वेळा केलेला आयुष्य संपावण्याचा प्रयत्न, काय होतं कारण?

Last Updated:
Roopa Ganguly : 'महाभारत' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली 'द्रौपदी' अर्थात रूपा गांगुलीला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला आहे.
advertisement
1/7
'द्रौपदी'ची दर्दभरी कहाणी, अभिनेत्रीने तीन वेळा केलेला आयुष्य संपावण्याचा प्रयत्
'महाभारत'च्या द्रौपदीच्या माध्यमातून अभिनेत्री रूपा गांगुली घराघरांत पोहोचली. पण वैयक्तिक आयुष्यासह अभिनयक्षेत्रातही रुपा गांगुली यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्रीने चक्क तीन वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.
advertisement
2/7
रूपा गांगुलीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. कोलकाता येथील जोगमाया देवी कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कुटुंबियांनीच रूपा यांना अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केलं. कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या आग्रहानंतर तिने 'निरुपमा' ही बंगाली शॉर्ट फिल्म केली. पण बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत'मधील द्रौपदीच्या माध्यमातून रूपा यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
advertisement
3/7
'महाभारत'मध्ये लोकप्रियता मिळाल्यानंतर रूपा गांगुली यांना अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा नव्हती. अभिनेत्रीला त्यावेळी संसार करायचा होता. तिने 1992 मध्ये मॅकेनिकल इंजीनिअर ध्रुव मुखर्जीसोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते विभक्त झाले.
advertisement
4/7
रूपा गांगुली म्हणालेल्या की त्यांचे पती ध्रुव यांना त्यांचं काम आणि स्टेटसवरुन अडचणी होती. पतीच्या आनंदासाठी तिने इंडस्ट्रीपासून दुरावा निर्माण केला. पण त्यानंतर पतीने तिला खर्चायला पैसे देणं बंद केलं.
advertisement
5/7
संसार मोडल्यानंतर रूपा गांगुली यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. अभिनेत्री अनेकदा दारू आणि सिगारेट ओढताना स्पॉट झाली आहे. तसेच आयुष्यातील निराशेमुळे त्यांनी तब्बल 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
advertisement
6/7
पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर रूपा गांगुली आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेला गायक दिव्येंदुच्या प्रेमात पडली. त्यांनी लिव्ह-इन मध्ये राहायला सुरुवात केली.
advertisement
7/7
रूपा गांगुली पुढे राजकारणातही वळल्या. सध्या त्या बीजेपी पक्षाकडून संसदेत काम करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'द्रौपदी'ची दर्दभरी कहाणी, अभिनेत्रीने तीन वेळा केलेला आयुष्य संपावण्याचा प्रयत्न, काय होतं कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल