TRENDING:

'त्याने मला सूरज चव्हाणमुळे ओळखलं', रितेशनं सांगितला Bigg Boss Marathi नंतर गावात घडलेला तो किस्सा

Last Updated:
Riteish Deshmukh - Suraj Chavan : बिग बॉस मराठीमुळे अभिनेता रितेश देशमुख होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस संपल्यानंतर एका गावात गेल्यानंतरचा एक किस्सा त्याने सगळ्यांबरोबर शेअर केला.
advertisement
1/9
'त्याने मला सूरज चव्हाणमुळे ओळखलं', रितेशनं सांगितला गावातील तो किस्सा
अभिनेता रितेश देशमुख हा गेली अनेक वर्ष मराठी तसंच बॉलिवूडमध्ये काम करतोय. अभिनेता तसंच आता बिग बॉस मराठीच्या निमित्तानं रितेश एक होस्ट म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
2/9
अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत असताना रितेश देशमुखनं त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  मात्र बिग बॉस मराठी 5 नंतर रितेशन देशमुखबरोबर असा एक प्रसंग घडला ज्यामुळे तो स्वत:ही शॉक झाला. 
advertisement
3/9
रितेश देशमुख एक प्रसिद्ध अभिनेता आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातील लोक त्याला ओळखतात. पण एका गावात गेला असता त्याला एका मुलाने रितेश नाही तर सूरज चव्हाणमुळे ओळखलं. नेमकं काय घडलं याचा किस्सा रितेशनं बिग बॉस मराठी 6 च्या निमित्तानं सांगितलं. 
advertisement
4/9
बिग बॉस मराठी नंतरचा एक खास आणि भावुक अनुभव शेअर करत रितेश म्हणाला, "मराठी प्रेक्षकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. बिग बॉस मराठी हा शो थेट प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचतो. त्या माध्यमातून मला प्रेक्षकांच्या अजून जवळ जाण्याची संधी मिळाली."
advertisement
5/9
बिग बॉस मराठीमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचे अनेक अनुभव रितेशने याआधीही सांगितले आहेत. मात्र नुकताच त्याने सांगितला तो चर्चेत आला. 
advertisement
6/9
रितेशनं सांगितलं, "मध्यंतरी केदार शिंदे यांच्या झापूक झुपूक सिनेमात्या रिलीज दरम्यान मी एका गावात होतो. तिथे एका छोट्या मुलाने मला बिग बॉस अशी हाक मारली."
advertisement
7/9
"तो सूरज चव्हाणचा फॅन होता. त्याला माझं नावंही माहिती नव्हतं पण त्याने मुलाने मला सूरजमुळे ओळखलं."
advertisement
8/9
रितेशनं सांगितलेल्या प्रसंगातून हे लक्षात येत की बिग बॉस मराठीचा प्रभाव किती खोलवर पोहोचला आहे. सूरज चव्हाणसारख्या स्पर्धकांनीही प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. 
advertisement
9/9
बिग बॉस मराठी 6 येत्या 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार आणि ते कोणता धमाका करणार, रितेश हा सीझन कसा होस्ट करणार, कोणाची शाळा घेणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याने मला सूरज चव्हाणमुळे ओळखलं', रितेशनं सांगितला Bigg Boss Marathi नंतर गावात घडलेला तो किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल