TRENDING:

सैफ अली खानने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, तुमच्या वर्षभराच्या कमाईच्या पाच पट आहे किंमत

Last Updated:
Saif Ali Khan : सैफ अली खानने मुंबईत मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अभिनेत्याने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
advertisement
1/7
सैफ अली खानने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकतीच मुंबईत मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात त्यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. सैफ अली खानने 30.75 कोटी रुपयांना दोन कमर्शियल ऑफिस युनिट खरेदी केली आहेत. मुंबईतील क्रिम एरियामध्ये त्यांची ही नवी प्रॉपर्टी आहे.
advertisement
2/7
'हिंदुस्तान टाइम्स'च्या अहवालानुसार, कनकिया वॉलस्ट्रीट बिल्डिंगमध्ये असलेल्या या दोन्ही युनिटचा एकूण एरिया 5,681 चौरस फूट आहे. सहा कार पार्किंगची सुविधाही यात समाविष्ट आहे. रिपोर्टनुसार, ही मालमत्ता अमेरिकास्थित औषध कंपनी एपिओर फार्मास्युटिकलने विकली आहे.
advertisement
3/7
सैफ अली खानने याच वर्षी एप्रिलमध्ये कतारमधील सेंट रेजिस मार्सा अरबिया आयलंड, द पर्ल येथील ‘द रेसिडेन्स’मध्ये एक आलिशान घर खरेदी केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने आणि चांगल्या व्ह्यूमुळे त्याला हे घर विशेष आवडले होते.
advertisement
4/7
सैफ अली खानची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपयांच्या आसपास आहे. सैफची मुंबईतील वांद्रे विभागात दोन आलिशान घरे आहेत. या घरांची किंमत 100 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं म्हटलं जातं.
advertisement
5/7
सैफ अली खान एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपयांचे मानधन घेतो. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत सैफ अली खानने अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केलं आहे. त्याने 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'परंपरा' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
advertisement
6/7
सैफ अली खान शेवटचा 'ज्वेल थीफ' या चित्रपटात झळकला होता. ओटीटीवर रिलीज झालेल्या या चित्रपटात जयदीप अहलावत, निकिता दत्त आणि कुणाल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होते.
advertisement
7/7
सैफ अली खान लवकरच 'डायनिंग विद द कपूर' आणि 'हैवान'मध्ये झळकणार आहे. सैफच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. सैफ अली खान 'ज्युनिअर पटौदी' म्हणून ओळखला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सैफ अली खानने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, तुमच्या वर्षभराच्या कमाईच्या पाच पट आहे किंमत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल