Rinku Rajguru: 'सैराट'नंतर रिंकू राजगुरुने केल्या इतक्या फिल्म; तुम्ही पाहिल्या की नाही? कोणती सर्वात जास्त आवडली?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Best Movies of Rinku Rajguru: सैराट सिनेमाने रिंकू राजगुरू ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीला दिली. एका रात्रीत स्टार होण्याचं भाग्या रिंकूच्या पदरात पडलं. सैराटनंतर रिंकून अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं. पण आजही तिला सैराटच्या आर्चीमुळेच ओळखलं जातंय. सैराटनंतर रिंकूने काम केलेले सिनेमे कोणते आहेत माहितीये?
advertisement
1/10

'सैराट' सिनेमामुळे आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा सिनेमा मराठीतील ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमामुळे रिंकू राजगुरुने प्रेक्षकांची मने जिंकली. सैराटनंतर अभिनेत्री रिंकूच्या हाती अनेक सिनेमे लागले.
advertisement
2/10
सैराट चित्रपटातून रिंकू लोकप्रिय झाली. या चित्रपटातील रिंकू राजगुरूच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिचा पहिलाट सिनेमा हिट ठरला.
advertisement
3/10
रिंकूने आर्ची बनून प्रेक्षकांची मने तर जिंकली. त्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर मिळाल्या. यातील कोणते सिनेमे रिंकूने केले यावर एक नजर टाकूया.
advertisement
4/10
2017 मध्ये मनसु मल्लिगे या चित्रपटात रिंकू राजगुरू दिसली होती. हा चित्रपट कन्नड भाषेत होता जो रोमँटिक ड्रामा होता.
advertisement
5/10
त्यानंतर रिंकूने कागर सिनेमात काम केलं. हा सिनेमा राजकारणावर आधारित होता. हा सिनेमात चांगलाच चर्चेत आला होता.
advertisement
6/10
रिंकू राजगुरुने मेकअप या सिनेमातही काम केलंय. यामध्येही ती हटके भूमिकेत पहायला मिळाली. या सिनेमात रिंकूसोबत अभिनेता चिन्मय उदगिरकरही होता.
advertisement
7/10
रिंकू राजगुरु अनकही कहानीयां या सिनेमातही झळकली. हा एक रोमॅन्टिक ड्रामा होता. यामध्ये तिने मंजरीच्या भूमिकेत दिसली. हा सिनेमा नेटफ्लिकवर उपलब्ध आहे.
advertisement
8/10
झुंड सिनेमातही रिंकू दिसली. यामध्ये मोनिकाची भूमिका रिंकूने साकारली होती. अमिताभ बच्चन स्टारर या सिनेमात आकाश ठोसरही होता.
advertisement
9/10
रिंकू आठवा रंग प्रेमाचा या रोमॅन्टिक सिनेमातही झळकली आहे. यामध्ये रिंकूचा रोमॅन्टिक अंदाज चांगलाच चर्चेत राहिला. अॅसिड हल्ला झालेल्या एका तरुणीची ही कहाणी आहे.
advertisement
10/10
200 हल्ला मध्ये रिंकूने आशा सुर्वेची भूमिका साकारली होती. ही एक क्राइम थ्रिलर फिल्म होती. तुम्ही आता ही zee 5 वर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru: 'सैराट'नंतर रिंकू राजगुरुने केल्या इतक्या फिल्म; तुम्ही पाहिल्या की नाही? कोणती सर्वात जास्त आवडली?