Saiyaara Meaning : 'सैयारा' म्हणजे नक्की काय? सिनेमाच्या नावामागचा नेमका अर्थ काय आहे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Saiyaara Meaning : सैयारा सिनेमा पाहण्यासाठी जाताय किंवा पाहून आलात. पण सैयारा म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ माहितीये का?
advertisement
1/9

18 जुलैला रिलीज झालेला सैयारा हा सिनेमा पाहण्यासाठी तरूण मंडळी थिएटरमध्ये विशेष गर्दी करत आहेत. हा सिनेमा कहो ना प्यार है, आशिकी सारख्या सिनेमांच्या आठवणी जाग्या करत आहे. सिनेमानं पहिल्या आठवड्यात 100 कोटींच्या वर कमाई केली आहे.
advertisement
2/9
सैयारा हा सिनेमाची सध्या सोशल मीडियाच नाही तर थिएटरच्या बाहेरची सैयाराची चर्चा आहे. अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. दोघांच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे.
advertisement
3/9
हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होतोय, लोक हा सिनेमा पाहून ढसाढसा रडत आहेत. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही सैयाराची चर्चा सुरू आहे. अनेक लोक जाऊन सिनेमा पाहत आहेत.
advertisement
4/9
हे सगळं सुरू असताना सैयारा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला का? काय आहे सैयाराचा नेमका अर्थ? पाहूयात.
advertisement
5/9
‘सैयारा’ हा सिनेमा 18 जुलै रोजी रिलीज झाला. फक्त 5 दिवसांत त्याने तब्बल 113.43 कोटी रुपये कमावले आहेत.
advertisement
6/9
Sacnilk या ट्रॅकिंग वेबसाईटनुसार, चित्रपटाची कमाई दररोज वाढतच चालली आहे ज्यामुळे हा सिनेमा सुपरहिट ठरणार आहे यात शंका नाही.
advertisement
7/9
सिनेमाचं नाव हे इतरांपेक्षा वेगळं आहे. ‘सैयारा’ म्हणजे काय? सिनेमाची हिरोईन वाणी हिरोला 'सैयारा' म्हणून हाक मारते. याचा अर्थ सिनेमातही स्पष्ट सांगितला आहे.
advertisement
8/9
सैयारा म्हणजे असा तारा जो आपल्या चमकदार अस्तित्वासोबत सतत पुढे जात राहतो, थांबत नाही. हिंदी/उर्दू भाषेत 'सैयारा' या शब्दाचा अर्थ 'सतत फिरणारा तारा किंवा wanderer star असा होतो.
advertisement
9/9
मोहित सुरी याचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आधुनिक काळातील DDLJ आहे असं चित्रपट विश्लेषक कोमल नाहटा यांनी म्हटलं आहे. यामध्ये तरुणाईला भावणारी प्रेमकथा, संगीत, इमोशन्स आणि रिलेट करण्यासारखी पात्रं यांचा सुंदर संगम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Saiyaara Meaning : 'सैयारा' म्हणजे नक्की काय? सिनेमाच्या नावामागचा नेमका अर्थ काय आहे?