TRENDING:

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' मध्ये भाईजानची एंट्री? टिझर रिलीजनंतर सलमान खानचा सेटवरचा Photo Viral

Last Updated:
Salmah Khan In Dhurandhar 2 : बहुप्रतीक्षित धुरंधर 2 या फिल्मच्या सेटवरील सलमान खानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
advertisement
1/5
'धुरंधर 2' मध्ये भाईजानची एंट्री; टिझर रिलीजनंतर सलमान खानचा सेटवरचा Photo Viral
रणवीर सिंहच्या धुरंधर 2 या चित्रपटाच्या टीझरच्या रिलीजनंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात फिल्मच्या सेटवर सलमान खानही दिसतो आहे. त्यामुळे धुरंधरच्या सीक्वेलमध्ये भाईजानची एंट्री असल्याची चर्चा आहे.
advertisement
2/5
3 जानेवारी 2025 ला 'धुरंधर : द रिव्हेंज' या फिल्मचं पोस्टर आणि टिझर रिलीज झाला. त्यानंतर या फिल्मच्या सेटवरीव फोटो व्हायरल होतो आहे, ज्यात सलमान खान दिसतो आहे.
advertisement
3/5
मेजर इक्बालची भूमिका साकारणारा अर्जुन रामपाल आणि एसपी अस्लमच्या भूमिकेत असलेला संजय दत्त यांच्यासोबत सलमान खानही बाल्कनीत उभा आहे. या फोटोमुळे धुरंधर 2 मध्ये सलमान खानच्या संभाव्य भूमिकेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. ज्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे, तिथं सलमान खान बडे साहबच्या भूमिकेच्या दिसू शकतो असं म्हटलं आहे. तर काहींना तो कॅमिओ करणार असल्याचा अंदाज बांधला.
advertisement
4/5
दरम्यान मेजर इक्बाल आणि एसपी अस्लमचा हा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात हे दोघंच दिसले होते.
advertisement
5/5
शिवाय ज्या devaimation इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानचा फोटो शेअर करण्यात आला, त्याच पोस्टला शेवटी हा फोटो एआय जनरेटेड असल्याचं सांगण्यात आलं आहे, जो कोणत्याची चुकीच्या माहितीसाठी नाही तर मनोरंजनासाठी बनवला गेल्याचं म्हटलं. याबाबत मेकर्सकडून अधिकृत विधान नाही, पण हा लीक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' मध्ये भाईजानची एंट्री? टिझर रिलीजनंतर सलमान खानचा सेटवरचा Photo Viral
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल