TRENDING:

Samantha Prabhu Honeymoon: आधी गुपचूप लग्न, आता समांथाने हनीमूनसाठी निवडलं खास ठिकाण; राज निदिमोरूचा क्यूट लूक व्हायरल

Last Updated:
Samantha Prabhu Honeymoon Pics: कोणालाही कानोकान खबर लागू न देता समांथाने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली. आता हे न्यूली वेड कपल हनीमूनसाठी परदेशी गेले असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
1/7
समांथाने हनीमूनसाठी निवडलं खास ठिकाण; राज निदिमोरूचा क्यूट लूक व्हायरल
मुंबई: साऊथ क्वीन समांथा रुथ प्रभुने १ डिसेंबर रोजी जेव्हा आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले, तेव्हा सोशल मीडियावर जणू भूकंपच आला. कोणालाही कानोकान खबर लागू न देता समांथाने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली. आता हे न्यूली वेड कपल हनीमूनसाठी परदेशी गेले असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
2/7
समांथा आणि राज पोर्तुगालच्या निसर्गरम्य लिस्बन शहरात आपल्या सुवर्णक्षणांचा आनंद घेत आहेत. समांथाने नुकतेच तिचे हनीमूनचे फोटो शेअर केले असून, चाहत्यांना तिचं हे हॅपी व्हर्जन प्रचंड आवडलं आहे.
advertisement
3/7
समांथाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लिस्बनच्या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रेमात पडलेली दिसतेय. या जोडीने फातिमा येथील 'अवर लेडी ऑफ द रोजरी बेसिलिका', भव्य 'पॅड्राओ डॉस डिस्कोब्रिमेंटोस' आणि शहराचं वैभव असलेला 'आर्को दा रुआ अगस्टा' या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.
advertisement
4/7
एका फोटोत राज निदिमोरु एका मोठ्या चॉकलेट डोनटकडे हरखून बघताना दिसतोय, तर दुसऱ्या एका फोटोत समांथा गुलाबी रंगाच्या टोपीत गोड स्मितहास्य करत आहे. हे फोटो शेअर करताना समांथाने लिहिलंय, "डिसेंबर असाच सरतोय..."
advertisement
5/7
समांथाच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही वर्षात अनेक चढ-उतार आले. नागा चैतन्यसोबतचा घटस्फोट आणि त्यानंतरचा आरोग्याचा लढा, या सगळ्यानंतर समांथाला असं मनापासून हसताना पाहून तिचे फॅन खूपच खूश झाले आहेत.
advertisement
6/7
एका युजरने कमेंट केली, "तिला आनंदी पाहून खूप बरं वाटतंय," तर दुसऱ्याने लिहिलं, "राजसोबत ती खरोखर सुरक्षित आणि सुखी वाटतेय." अनुपमा परमेश्वरन आणि निमरत कौर यांसारख्या सेलिब्रिटींनीही या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
advertisement
7/7
समांथा आणि राज यांची केमिस्ट्री केवळ वैयक्तिक आयुष्यातच नाही, तर पडद्यावरही सुपरहिट ठरली आहे. 'द फॅमिली मॅन २' आणि 'सिटाडेल: हनी बनी' यांसारख्या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये राजने समांथाला डायरेक्ट केलं होतं. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ही मैत्री आता आयुष्यातील महत्त्वाची साथ बनली आहे. विशेष म्हणजे हे दोघांचंही दुसरं लग्न आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Samantha Prabhu Honeymoon: आधी गुपचूप लग्न, आता समांथाने हनीमूनसाठी निवडलं खास ठिकाण; राज निदिमोरूचा क्यूट लूक व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल