TRENDING:

Shubhangi Sadavarte : 'जे झालंय, जे होतंय...' दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री सदावर्तेची पोस्ट चर्चेत

Last Updated:
Shubhangi Sadavarte Post : अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं नुकतंच दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर शुभांगीनं लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
1/7
'जे झालंय, जे होतंय...' दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री सदावर्तेची पोस्ट चर्चेत
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं काही दिवसांआधीच दुसरं लग्न केलं. तिच्या दुसऱ्या लग्नाचे व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. शुभांगीच्या दुसऱ्या लग्नाची बातमी कळताच चाहत्यांनाही आश्चर्य व्यक्त केलं होतं.
advertisement
2/7
दुसऱ्या लग्नाच्या काही महिने आधीच शुभांगीचा डिवोर्स झाल्याची माहिती समोर आली होती. शुभांगीच्या पहिल्या नवऱ्यानं पोस्ट शेअर करत त्यांचा डिवोर्स झाल्याची माहिती दिली.
advertisement
3/7
डिवोर्सची माहिती समोर आल्यानंतर चार महिन्यातच अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं दुसरं लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. शुभांगीने निर्माता सुमीत म्हशेळकर बरोबर दुसरं लग्न केलं.
advertisement
4/7
5 डिसेंबर 2025 रोजी शुभांगी आणि सुमीत यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये शुभांगीनं लग्न केलं. लग्नानंतर घरी सत्यनारायणची पूजा ठेवण्यात आली होती.
advertisement
5/7
शुभांगीने तिच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचे व्हिडीओ देखील शेअर केले होते. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करताना शुभांगी आणि सुमीत यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.
advertisement
6/7
शुभांगीनं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तिथला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "स्वामी म्हणतात.. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे, ते चांगल्यासाठीच…"
advertisement
7/7
शुभांगीचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओकबरोबर झालं होतं. कोरोना काळात 2020 साली त्यांनी लग्न केलं. पण काही वर्षात त्यांचा डिवोर्स झाला. डिवोर्सच्या काही वर्षांनी दोघांनी ही माहिती चाहत्यांना दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shubhangi Sadavarte : 'जे झालंय, जे होतंय...' दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री सदावर्तेची पोस्ट चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल