Sanjay Dutt: 'माझ्याकडून चूक झाली बाबा', सुनील दत्त यांना पाहून कोसळला संजू बाबा, पाय पकडून ढसाढसा रडला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sunjay Dutt Mumbai Bomb-Blast: मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने २५७ लोकांचा बळी तर घेतलाच, पण त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्याचा प्रवासही कायमचा बदलला.
advertisement
1/11

मुंबई: १२ मार्च १९९३! हा दिवस मुंबईकरांच्या मनात आजही एक भयानक आठवण म्हणून घर करून आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने केवळ २७ कोटी डॉलरचे नुकसान आणि २५७ लोकांचा बळी घेतला नाही, तर अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्याचा प्रवासही कायमचा बदलला.
advertisement
2/11
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या या षड्यंत्राच्या तपासात आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांची भूमिका ऐतिहासिक होती. याच तपासाबद्दल राकेश मारिया यांनी नुकतंच एका मुलाखतीत ३२ वर्षांपूर्वीची घटना उघड केली. ही घटना जोडलेली होती, बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्त याच्याशी.
advertisement
3/11
राकेश मारिया यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटांमध्ये वापरली गेलेली स्फोटके आणि शस्त्रे मुंबईतच लपवून ठेवण्यात आली होती. तपास सुरू असताना बांद्रातील रेस्टॉरंट मालक हनीफ कादावाला आणि IMPPA चे अध्यक्ष समीर हिंगोरा या दोघांना अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक झाली. चौकशीत त्यांनी संजय दत्तचे नाव घेतले आणि मारिया यांना धक्काच बसला.
advertisement
4/11
मारियांच्या माहितीनुसार, “शस्त्रे काढण्यासाठी शांत जागा हवी होती. म्हणून आरोपींनी संजय दत्तच्या बंगल्याचे ठिकाण सुचवले. संजूला आधीच फोन गेला होता. दहशतवादी संजयच्या घरी पोहोचले. त्याने गाडी पार्क करायला आणि सामान उतरायला सांगितले.”
advertisement
5/11
चौकशीत कळले की, संजयने काही शस्त्रे स्वतःकडे ठेवली होती, पण नंतर ती दहशतवाद्यांना परत केली, ज्यांचा स्फोटात वापर झाला. मारियांच्या मते, “संजयने चूक केली, पण तो दहशतवादी नव्हता; तो फक्त घाबरला होता.”
advertisement
6/11
संजय दत्त मॉरिशसमध्ये शूटिंग करत होता. मारियांच्या टीमने त्याच्या येण्याची वाट पाहिली आणि मुंबई विमानतळावर उतरताच त्याला थेट ताब्यात घेतले. "कोणताही ड्रामा नाही, थेट क्राइम ब्रांचला घेऊन गेलो," मारिया यांनी सांगितले.
advertisement
7/11
क्राइम ब्रांचच्या खोलीत संजय दत्तला ठेवले होते. मध्यरात्रीपासून सकाळी ८ वाजेपर्यंत तो सिगारेट आणि फोनशिवाय बसून होता. सकाळी मारिया आत गेले आणि संजूला म्हणाले, “तुझी कहाणी सांगतोस, की मी तुझा रोल सांगू?”
advertisement
8/11
संजयने कबूल न केल्यावर मारिया यांचा राग अनावर झाला. मारिया यांनी सांगितलं, “माझा संयम तुटला. मी गेलो, एक थप्पड मारली. तो खुर्चीवरून खाली पडला. मी त्याचे केस ओढून त्याला उभे केले आणि विचारले, ‘जेंटलमॅनप्रमाणे बोलणार की नाही?’ मग संजयने संपूर्ण कहाणी कबूल केली.”
advertisement
9/11
संजयने कबुली दिल्यावर त्याची पहिली विनंती होती, “माझ्याकडून चूक झाली, पण माझ्या वडिलांना सांगू नका!” संध्याकाळपर्यंत सुनील दत्त, राजेंद्र कुमार, महेश भट यांसारख्या मोठ्या व्यक्तींसह क्राइम ब्रांचला पोहोचले. पण सर्वात हृदयद्रावक क्षण तेव्हा आला, जेव्हा संजय दत्तला वडिलांसमोर आणले.
advertisement
10/11
मारिया म्हणाले, "संजयने आपल्या वडिलांना पाहिले आणि लहान मुलासारखा त्यांना बिलगून रडला. तो थेट सुनीलजींच्या पायांवर पडला आणि म्हणाला, 'पापा, माझ्याकडून चूक झाली!'"
advertisement
11/11
हा भावनिक प्रसंग पाहून सुनील दत्त यांचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडला होता. या प्रसंगाने स्पष्ट केले की, कायदा सर्वांसाठी समान असला तरी, आपल्या मुलाला अपराधी म्हणून पाहणे एका वडिलांसाठी किती वेदनादायक असू शकते. संजय दत्तने त्याची शिक्षा पूर्ण केली, पण या घटनेने बॉलिवूडला एक मोठा धक्का बसला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sanjay Dutt: 'माझ्याकडून चूक झाली बाबा', सुनील दत्त यांना पाहून कोसळला संजू बाबा, पाय पकडून ढसाढसा रडला