TRENDING:

'तो तुम्हाला बघेल तरी का?' विकीसोबत डेटवर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या मराठी अभिनेत्रींना संतोष जुवेकरने सुनावलं

Last Updated:
Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत त्याने मराठी कलाकार आणि त्यांच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवलं आहे.
advertisement
1/7
विकीसोबत डेटवर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या अभिनेत्रींना संतोष जुवेकरने सुनावलं
मुंबई: ‘झेंडा’, ‘मोरया’ आणि ‘लालबाग परळ’ यांसारख्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण करणारा अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
2/7
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने मराठी कलाकार आणि त्यांच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवलं आहे. ‘आपलेच लोक आपल्या कलाकारांचा आदर करत नाहीत’, असं मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य संतोषने केलं आहे.
advertisement
3/7
संतोष जुवेकरने ‘इसापनीती’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
advertisement
4/7
संतोष म्हणाला, “मी एका खूप मोठ्या अभिनेत्रीची मुलाखत पाहिली. त्या दाक्षिणात्य कलाकाराचं कौतुक करत होत्या. तो किती गोड आहे, खाली मांडी घालून बसून जेवला, असं त्या सांगत होत्या. आणि मग म्हणाल्या, ‘आपले मराठी कलाकार जरा काम मिळालं की माज दाखवतात!’”
advertisement
5/7
संतोषने त्या अभिनेत्रीला नंतर भेटून विचारणा केली, “मी तुमच्यासोबत काम केलं, मी कधी वाईट वागलो? तुम्ही बाहेरच्या मोठ्या स्टारचं कौतुक करा, पण तुम्ही आपल्याच घरातल्या माणसांना मान दिला नाही, तर बाहेरचे लोक काय मान देणार?” संतोषचा हा संताप खूप काही सांगून जातो.
advertisement
6/7
याचबरोबर संतोषने मराठी अभिनेत्रींवरही खोचक टीका केली आहे. डेटवर कोणासोबत जायला आवडेल, असं विचारल्यावर मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावं घेतात, यावर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
advertisement
7/7
तो म्हणाला, “आपल्या अनेक अभिनेत्रींना डेटवर जायला रणबीर कपूर, विकी कौशलच का पाहिजे? ते तुमच्याकडे बघतील तरी का? तुम्हाला अंकुश चौधरी, सुबोध भावे, प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, उमेश कामत दिसत नाहीत का? ते सगळेही हँडसम आहेत आणि स्टार आहेत. तुम्हालाच तुमच्या कलाकारांबद्दल आदर नसेल, तर मराठी सिनेमा कसा चालेल?”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तो तुम्हाला बघेल तरी का?' विकीसोबत डेटवर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या मराठी अभिनेत्रींना संतोष जुवेकरने सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल