TRENDING:

ना शाहिद, ना सैफ, बॉलिवूडच्या टॉप व्हिलनच्या प्रेमात वेडी होती करीना कपूर! प्रेमाखतर 20 वेळा पाहिली एकच फिल्म

Last Updated:
Kareena Kapoor Crush: बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर खानने एका मुलाखतीत या अभिनेत्याचे गुणगान गायले होते. करीनाने त्याच्यावर तिचे किती प्रेम होते, हे प्रामाणिकपणे कबूल केले होते.
advertisement
1/9
ना शाहिद, ना सैफ, बॉलिवूडच्या टॉप व्हिलनच्या प्रेमात वेडी होती करीना कपूर!
मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या एकाच अभिनेत्याची चर्चा आहे, तो म्हणजे अक्षय खन्ना! आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटात अक्षयने अशी काही परफॉर्मन्स दिली आहे की सोशल मीडियावर चाहते त्याचे अक्षरशः गुणगान गात आहेत.
advertisement
2/9
त्याचा 'रहमान डकैत' हा खलनायकी रोल, विशेषतः Flipperachi च्या 'Fa9la' या गाण्यावर त्याची व्हायरल झालेल्या एंट्रीने, सगळ्यांना वेड लावले आहे.
advertisement
3/9
हे वर्ष अक्षय खन्नासाठी खूप लकी ठरले आहे. अक्षयच्या या कूल, पण तितक्याच जबरदस्त कमबॅकमुळे त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्काच बसला आहे. अशातच त्याच्याबद्दलची एक जुनी आणि अत्यंत गोड आठवण सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेन्डिंग झाली आहे.
advertisement
4/9
बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर खानने एका मुलाखतीत अक्षय खन्नाचे गुणगान गायले आहेत. २००४ मध्ये 'हलचल' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीची क्लिप आता व्हायरल झाली आहे, ज्यात करीनाने शाळेत असताना अक्षय खन्नावर तिचे किती प्रेम होते, हे प्रामाणिकपणे कबूल केले होते.
advertisement
5/9
शाळेतील आठवणींना उजाळा देताना करीनाने अतिशय निरागसपणे सांगितले होते, "मी 'हिमालय पुत्र' चित्रपट कमीतकमी २० वेळा पाहिला असेल! कारण त्यावेळी मी शाळेत होते आणि अक्षय खन्ना हा सगळ्या मुलींचा 'लेटेस्ट हार्टथ्रोब' होता."
advertisement
6/9
ती पुढे म्हणाली, "त्याच्या मागे मुली वेड्या होत्या आणि त्यात मीही होते! तो माझा क्रश होता. मला आठवतंय, 'अक्षय खन्ना, आय ॲम ए बॅचलर, आय ॲम ए बॅचलर, माय गॉड अक्षय खन्ना...' असे मनात चालायचे. त्यामुळे मला अक्षय नेहमीच खूप आवडायचा."
advertisement
7/9
करीनाने केवळ त्याच्या अभिनयाबद्दलच नाही, तर एक व्यक्ती म्हणूनही अक्षयचे भरभरून कौतुक केले होते. "तो खूप क्यूट, ॲडोरेबल आहे आणि एक खूप चांगला माणूस आहे. तो एक अद्भुत अभिनेता आहे! मला वाटते की तो थेट हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी योग्य आहे, कारण त्याचा परफॉर्मन्स खूप माईंड-ब्लोईंग असतो," असेही करीना म्हणाली होती.
advertisement
8/9
या दोघांनी एकत्र 'हलचल' या गाजलेल्या कॉमेडी चित्रपटात काम केले होते, जो मल्याळम चित्रपट 'गॉडफादर'चा रिमेक होता. दोन कट्टर विरोधी कुटुंबांमधील खोटी-प्रेमकथा खरी ठरण्याची ही कहाणी आजही प्रेक्षकांना खूप आवडते.
advertisement
9/9
२०२५ मध्ये अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो किती प्रतिभावान आहे. वर्षाच्या सुरुवातीला 'छावा'मध्ये विकी कौशलसोबत त्याने औरंगजेबाची भूमिका केली आणि आता 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंग, आर. माधवन, संजय दत्त यांच्यासारख्या कलाकारांसोबत तो खलनायक म्हणून चमकला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना शाहिद, ना सैफ, बॉलिवूडच्या टॉप व्हिलनच्या प्रेमात वेडी होती करीना कपूर! प्रेमाखतर 20 वेळा पाहिली एकच फिल्म
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल